Bharat Jodo Yatra: ‘ओ मेरे बडे भाई' अशी हाक मारत, दिली कौतुकाची थाप !

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेतील भावा बहिणीमधील सुंदर बॉण्डिंग
Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Rahul Gandhi, Priyanka GandhiSarkarnama

Rahul Gandhi Priyanka Gandhi : सप्टेंबर महिन्यापासून सुरु झालेल्या काँग्रेसच्या (Bharat jodo yatra) ‘भारत जोडो यात्रे’मध्ये बरेच पैलू पाहायला मिळाले. राज्यांच्या सीमा ओलांडता असतांना, या यात्रेमध्ये त्या त्या राज्याची, प्रांताची झलक पाहायला मिळाली. (Kanyakumari) कन्याकुमारीपासून म्हणजेच देशाच्या (South india) दक्षिणेकडील टोकापासून सुरु झालेला हा प्रवास आता उत्तरेच्या दिशेनं पुढे जात आहे.

'भारत जोडो यात्रा' नऊ दिवसांच्या विश्रांतीनंतर उत्तर प्रदेशात दाखल झाली. यादरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) वढेरा आणि पक्षाच्या अनेक नेत्यांनी गाझियाबादमध्ये राहुल गांधींचे (Rahul Gandhi) स्वागत केले. यावेळी राहुल-प्रियांका यांच्यातील एका वेगळा अंदाज दिसला. त्यांना भावाला पाहून प्रचंड आनंद झाला. सोशल मीडियावर यावेळचे काही व्हिडीओ आणि फोटोसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत दिसलं बहिण भावाचं निखळ प्रेम; पाहा फोटो

यावेळी नेमकं काय घडलं.

भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशातील लोणी ( गाझियाबाद) मधील एका कार्यक्रमात भावा बहिणीमधील सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळाले. यावेळी राहुल-प्रियांका एका वेगळ्या अंदाजात स्टेजवर होते. दोन्ही भावंडांचे प्रेम आणि खोडकरपणा ज्यांनी कोणी पाहिला त्याला हसू आवरता आले नाही. एक व्हिडिओ काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. यादरम्यान राहुल आपल्या बहिणीला त्रास देताना दिसले. ज्याप्रमाणे एक मोठा भाऊ लहान बहिणीची काळजी घेतो, तिचे लाड करतो अगदी तसंच राहुल गांधीसुद्धा करताना दिसले. 

माझा भाऊ एक योद्धा आहे… 

‘ओ मेरे बडे भाई…. इधर देखो’ असं त्या राहुल गांधी यांचं लक्ष वेधत म्हणाल्या. माझ्या मोठ्या भावा, मला तुमचा सर्वात जास्त अभिमान आहे. सत्ताधाऱ्यांनी पूर्ण ताकद लावली, त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी सरकारने हजारो कोटी रुपये खर्च केले, पण ते सत्यापासून मागे हटले नाहीत. एजन्सी स्थापन झाल्या, पण तो घाबरला नाही... तो योद्धा आहे.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, राहुल यांनी सत्याचे कवच परिधान केले आहे, ज्यामुळे देव त्यांना थंडीपासून आणि इतर सर्व गोष्टींपासून वाचवेल. राहुल गांधींना कोणीही विकत घेऊ शकत नाही. तो सत्यापासून मागे हटणार नाही.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Priyanka Gandhi : ''अदानी,अंबानींनी सर्वांना विकत घेतलं, पण राहुल गांधींना ते विकत घेऊ शकले नाही;कारण..!''

माझा मोठा भाऊ, मला तुझा सर्वात अभिमान आहे.. 

भावाला हाक मारत आपल्याला सर्वाधिक अभिमान त्याचाच वाटतो या शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांचं कौतुक केलं.  माझ्या भावानं एक प्रेमाचं दुकान सुरु केलंय आणि हे दुकान प्रत्येक गल्लीबोळात, देशाच्या कानाकोपऱ्यात असायला हवं नाहीतर कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी 'मोहब्बत की दुकान'चे फ्रेंचायझी उघडण्याचे आवाहनही प्रियंका गांधी यांनी केले. राहुल गांधींच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

अदानी आणि अंबानी यांनी (Adani and Ambani) यांनी सर्वकाही विकत घेतलं पण, ते माझ्या भावाला मात्र विकत घेऊ शकले नाहीत. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही ते शक्य नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in