ईडीचे प्रश्न संपेना; राहुल गांधींना सलग तिसऱ्या दिवशीही चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Rahul Gandhi| ED| National Herald case| नॅशनल हेराल्डशी संबंधी प्रकरणात राहुल गांधी यांची गेल्या दोन दिवसांत अठरा तासाहून अधिक काळ चौकशी झाली आहे
ईडीचे प्रश्न संपेना; राहुल गांधींना सलग तिसऱ्या दिवशीही चौकशीला हजर राहण्याचे आदेश
Rahul Gandhi News, National Herald case news updates

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सलग तिसऱ्या दिवशीही चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. दोन दिवस अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशी केल्यानंतरही ईडीने त्यांना सलग तिसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलवल आहे. त्यामुळे आज (15 जून) पुन्हा एकदा राहुल गांधी तिसऱ्या दिवशी ईडीसमोर हजर राहणार आहेत. (Rahul Gandhi Latest Marathi News)

नॅशनल हेराल्डशी सबंधित मनी लॉण्ड्रिग प्रकरणी ईडीने सोमवारी (13 जून) राहुल गांधी यांची साडेआठ तास आणि मंगळवारी (14 जून) ही चौकशी दहा तासांहून अधिक चौकशी केली. ईडी कार्यालयात पोहोचण्यापुर्वी राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयातही गेले होते. तर त्यांच्यासोबत बहिण प्रियंका गांधीही-वाड्रा यादेखील त्यांच्यासोबत ईडी कार्यालयात पोहोचल्या. त्याचवेळी पोलिसांनी कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

Rahul Gandhi News, National Herald case news updates
राज ठाकरेंच्या वाढदिवशी ५४ रुपये लिटर पेट्रोल विक्रीचा स्टंट गेला फेल!

राहुल गांधींच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभुमीवर दिल्ली पोलिसांनी अकबर रोडवर जमावबंदीचे आदेश लागू केले होते. त्यावर संतप्त कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस मुख्यालयात पोहोचू दिलं जात नसल्याचा आरोप काँग्रेसने केला. तसेच, मंगळवारी (14 जून) छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांच्यासह अधीर रंजन चौधरी, रंजीत रंजन, इम्रान प्रतापगढी, गौरव गोगोई, दीपेंद्र सिंग हुड्डा यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

या घटनांवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. "इथल्या सरकारचा पोलीस प्रशासनावर किती दबाव आहे हे यातून दिसत आहे. कायद्याने आपलं काम करावं, जमावबंदी लागू केली तर आम्हाला ताब्यात घ्या पण तुम्ही आम्हाला पक्ष कार्यालयात जाण्यापासून रोखू शकत नाही, लोकशाहीची हत्या करण्याच काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

तर, काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मंगळवारी राहुल यांच्या ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या निशाण्यावर फक्त राहुल गांधी आणि काँग्रेसच का आहे? सार्वजनिक प्रश्नांवर आवाज उठवणारा आवाज दाबण्यासाठी ईडीची कारवाई करण्याचा कट आहे का? असे अनेक सवाल सुरजेवाला यांनी उपस्थित केले. पोलीसांनी काल 11 तास हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं. वसंतकुंज पोलीस स्टेशन, फतेहपूर बेरी पोलीस स्टेशन, नरेला पोलीस स्टेशन, बदरपूर पोलीस स्टेशन, मंदिर मार्ग पोलीस स्टेशन आणि दिल्लीतील डझनभर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. असेही सुरजेवाला यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in