राऊत म्हणाले, "काँग्रेस नेतृत्वासाठी राहुल गांधी हे एकच पर्याय"

काँग्रेसच्या नेतृत्वासाठी राहुल गांधी हा एकमेव पर्याय आहे. त्यांना पक्षातील सर्वांकडून मान्यता मिळाली आहे," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut  Rahul Gandhi.jpg
Sanjay Raut Rahul Gandhi.jpg

मुंबई : "देशाला एका मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. काँग्रेसच्या नेतृत्वासाठी राहुल गांधी हा एकमेव पर्याय आहे. त्यांना पक्षातील सर्वांकडून मान्यता मिळाली आहे," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले की देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. काँग्रेस पक्ष सध्या अंतर्गत वादामुळे त्रस्त आहे. यातून बाहेर पडून काँग्रेसला काम करावे लागेल. सोनिया गांधी यांचे वय झाले असून प्रियंका गांधी या पूर्णवेळ राजकारणात सक्रीय नाही. तसेच काँग्रेसमध्ये अनेक वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्यामुळे राहुल गांधी यांना काम करता येत नाही. काँग्रेसमध्ये गांधी घराण्याशिवाय कोणताही नेता अध्यक्ष होईल, असे सध्या तरी दिसत नाही. 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्राबाबत भाष्य करण्यात आले होते. या पत्रामुळे राहुल गांधी यांचे नेतृत्व संपविण्याचा हा कट असल्याचे यात म्हटले होते. 
ज्यावेळी राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांच्यावर टिका करण्यात आली, तेव्हा हे काँग्रेसचे वरिष्ठ नेता कोठे होते, असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला होता.  काँग्रेसपक्षातच राहुल गांधी यांना पक्षातून संपविण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे राहुल गांधी यांना खूप वाईट वाटले. भाजपने टिका केल्यानंतरही राहुल गांधी यांचे इतके मन इतके दुखावले नसेल, तितके काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे राहुल गांधी यांचे मन दुखावले आहे.  

हेही वाचा : सैयद जफर इस्लाम बनणार भाजपचे सहावे मुस्लिम खासदार  

नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने आपले राष्ट्रीय प्रवक्ते व एअर इंडियाचे संचालक सैयद जफर इस्लाम यांना उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी मैदानात उतरविले आहे. ते विजयी होणे जवळपास नक्की मानले जाते. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपच्या गळाला लावण्यात इस्लाम यांनी बजावलेल्या कळीच्या भूमिकेचे बक्षीस त्यांना मिळाल्याचे मानले जाते. सैयद जफर इस्लाम विजयी झाल्यास जनसंघानंतर राजकीय पक्ष बनलेल्या भाजपचे गेल्या चार दशकांतील ते केवळ सहावे मुस्लिम खासदार ठरतील. सध्या भाजपच्या सुमारे 390 खासदारांपैकी राज्यसभेतून केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे एकमेव शिया मुस्लिम खासदार आहेत. भाजपच्या संपूर्ण इतिहासात ज्येष्ठ नेत्या नजमा हेप्तुल्ला यांच्यासह नक़वी, सिकंदर बख्त (राज्यसभा) तसेच शहनवाज़ हुसेन व आरिफ बेग (लोकसभा) हे पाचच मुस्लिम नेते खासदार झाले आहेत.  
     
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com