Rahul Gandhi News : केंब्रिजच्या व्यासपीठावर राहुल गांधींनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक ; म्हणाले..

Rahul Gandhi in Cambridge University : कौतुकासोबत कठोर टिकाही केली...
Rahul Gandhi : Narendra Modi : Rahul Gandhi in Cambridge University : Congress News :
Rahul Gandhi : Narendra Modi : Rahul Gandhi in Cambridge University : Congress News :Sarkaranama

Congress News : काँग्रेसचे शीर्षस्थ नेते व खासदार राहुल गांधींनी नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) राजकीय टीका-टिपण्णी करताना दिसून येतात. राहुल गांधींनी नेहमी म्हणतात की, मोदींशी त्यांचं वैचारिक संघर्ष आहे. मात्र आता राहुल गांधींनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली आहे. राहुल गांधींनी केलेल्या प्रशंसेनंतर आता एकच चर्चा होताना दिसून येत आहे.

इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात अतिथी प्राध्यापक म्हणून राहुल गांधी इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मोदींच्या धोरणाचे कौतुक केले. केंब्रिज विद्यापीठात उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते राहुल गांधी म्हणाले, "मोदी सरकारकडून महिलांसाठी आणलेली उज्ज्वला योजना आणि लोकांची बँक खाती उघडणे, हे सरकारचे एक चांगले पाऊल आहे. "

Rahul Gandhi : Narendra Modi : Rahul Gandhi in Cambridge University : Congress News :
Soniya Gandhi : मोठी बातमी! काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली

केंब्रिजमधील या कार्यक्रमात राहुल गांधींना मोदी सरकारच्या भारताच्या हिताच्या दृष्टीने काही धोरणे आहेत का? असे विचारले असता राहुल गांधींनी मोदी सरकारच्या चांगल्या धोरणांबद्दल उल्लेख करताना उज्ज्वला योजना आणि जन धन योजनेबाबतचा चांगले पाऊल असल्याचे सांगितले. राहुल गांधी म्हणाले की, "कदाचित ग्राणीण भागातील महिलांना गॅस सिलेंडर देणे आणि लोकांची बँक खाती उघडणे हे चांगले पाऊल आहे. "

राहुल गांधींनी यावेळी मोदींवर कठोर टीकाही केली. भारत हा धार्मिक विविधता असलेला देश आहे. शीख, मुस्लीम, ख्रिश्चन हे सर्वच भारतात आहेत. पण मोदी या धर्माच्या लोकांना भारतातील दुय्यम नागरिक मानतात. हे मला कधीच मान्य होणार नाही. मोदी (PM Modi) हे भारताची रचना, भारतांच भारतीयत्व बिघडवत आहेत, अशी टिकाही त्यांनी केली.

Rahul Gandhi : Narendra Modi : Rahul Gandhi in Cambridge University : Congress News :
HSC Board Paper : बारावीचा पेपर फुटला, तक्रार दाखल : विरोधीपक्षनेते म्हणतात, 'पेपर फोडण्यात सरकारचा सहभाग?'

आज भारतात लोकशाही धोक्यात आहे. माझ्यावर गुन्हे दाखल केले गेले आहेत. विरोधीपक्ष नेत्यांना बोलण्यासाठी तुरुंगात टाकले जात आहे. असं भारतात वारंवार घडत आहे, असंही राहुल गांधींनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in