Rahul Gandhi News : "राहुल गांधी मुलांना जन्माला घालू शकत नाहीत" ; भाजप प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य!

Congress News : "रस्ते आणि गटार यासारखे छोटे मुद्दे सोडून, तुम्ही लव्ह जिहादवर लक्ष केंद्रित केलं पाहिजं."
Rahul Gandhi News :
Rahul Gandhi News : Sarkarnama

Rahul Gandhi News : कर्नाटक राज्य विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना, राजकीय आऱोप प्रत्यारोप व व्यक्तिगत वार - प्रतिवाराला धार आले आहे. भाजपचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा खासदार नलिन कुमार (Nalin Kumar) यांनी राहुल गांधींबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले.

नलिन कुमार म्हणाले, "राहुल गांधी लग्र करत नाहीत, कारण- त्यांना मुलं निर्माण करता येत नाही." त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ आता समाज माध्यमात व्हायरल झाले आहे.

नलिन यांचे हे पहिल्यांदाच वादग्रस्त वक्तव्य नाही.यापूर्वीही नलिन यांनी अशी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यापुर्वींचं त्यांच्या एक ताज्या वक्तव्याची चर्चा होती. ते कार्य़कर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, "रस्ते आणि गटार यासारखे छोटे मुद्दे सोडून, तुम्ही लव्ह जिहादवर लक्ष केंद्रित केलं पाहिजं." त्यांच्या या वक्तव्याची चर्चा असतानाच आता राहुल गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत ते म्हणतात, "सिद्धरामय्या (कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते) आणि राहुल गांधी यांनी पूर्वी सांगितलं होतं की, तुम्ही कोरोनाची लस घेऊ नका. कारण - लस घेतल्याने तुम्हाला मुलं होणार नाहीत. मात्र नंतर त्यांनीच कोरोनाची लस घेतली. एक दिवसांपूर्वीच आपले आमदार मंजुनाथ म्हणाले होते की, राहुल गांधी लग्न करत नाहीत, कारण - त्यांना मुलंच होऊ शकत नाहीत." आता भाजप नेत्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Rahul Gandhi News :
Satara : खासदारांचे पेंटिंग हा बालिशपणाचा कळस; समर्थकांना आवर घाला : शिवेंद्रसिंहराजे

यावर काँग्रेसकडूनही पलटवार करण्यात आलं आहे. "भाजप नेत्याला गंभीर मानसिक विकार झाला आहे. काँग्रेसच्या आमदार प्रियांक खर्गे म्हणाल्या, "भाजपचे नलिन कुमार यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावी तेवढी थोडी आहे. त्यांना गंभीर मानसिक विकाराने ग्रासले आहे.

यावर भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री के सुधाकर म्हणाले, "आमच्या प्रदेशाध्यक्षांनी हे वक्तव्य कोणत्या संदर्भाने केले, हे मला माहित नाही. मात्र आम्हाला या वक्तव्यापासून दूरच राहायचे नाही, असे भाजपने म्हंटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com