Rahul Gandhi News : संघाची तुलना 'मुस्लीम ब्रदरवूड'शी : राहुल गांधींच्या विधानाने भाजप आक्रमक!

Rss : सगळ्या स्वायत्त संस्था दबावाखाली आणण्याचा प्रयत्न, गांधींची टीका..
Rahul Gandhi News :
Rahul Gandhi News : Sarkarnama

Rahul Gandhi News : काँग्रेसचे खासदार व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला भारत जोडो यात्रा पुर्ण केल्यावर आता ते ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी यांनी भाषण केल्यानंतर, या दरम्यान त्यांची एक मुलाखतसुद्धा पार पडली. या दौऱ्यांमध्ये राहुल गांधी यांनी काही वक्तव्ये केली आहेत. या वक्तव्यांवर भाजपने आक्षेप घेतला असून, गांधीवर पलटवार केला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ब्रिटन दौऱ्यावर असताना, राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचं मुस्लीम ब्रदरहूड संघटनेशी तुलना केली होती. राहुल गांधी म्हणाले, आरएसएस तुम्ही याला खासगी संघटना म्हणू शकता. मुस्सीम ब्रदरहुड सारखं आरएसएस कार्यरत आहे. भारतातल्या अनेक स्वायत्त संस्थांवर त्यांचा वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न असतो. माध्यमं, न्यायव्यवस्था, संसद, निवडणूक आयोग अशा सगळ्या संस्था भारतात दबावाखाली आहेत. एका विशिष्ट पद्धतीने या संस्थांना हाताळण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi News :
Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; 270 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

ज्या नेत्याचं भारतात कोणी ऐकत नाही, तो नेता विदेशात जाऊन आमच्यावर टीका करतो, असे उत्तर भाजपकडून दिले गेले आहे. भाजपचे प्रवक्ते रवीशंकर प्रसाद (Ravishankar Prasad) म्हणाले, देशाची जनता राहुल गांधींचं ऐकत नाही, त्यांना समजून घेत नाही. त्यांचं समर्थन करण्याची गोष्ट तर दूर, विदेशात जाऊन ते विलाप करतात. म्हणतात, भारतात लोकशाही धोक्यात आहे. ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. ब्रिटनमध्ये जाऊन त्यांनी आपल्या भाषणात भारताचा अपमान केला आहे, असे प्रसाद म्हणाले.

Rahul Gandhi News :
Rahul Gandhi News : "राहुल गांधी मुलांना जन्माला घालू शकत नाहीत" ; भाजप प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य!

काय आहे मुस्लीम ब्रदरहूड संघटना?

राहुल गांधी यांनी आरएसएसशी तुलना मुस्लीम ब्रदरहूडशी केली आहे. मुस्लीम ब्रदरहूड ही इस्लाम मूलतत्ववादाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. मुस्लीम ब्रदरहूड ही इजिप्तमध्ये बंदी घातलेली संघटना आहे.देशाचा कारभार शरयानुसार चालावा, यासाठी ही संघटना कार्यरत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com