राहुल गांधीचा हार्दिक पटेलांना 'खास' मेसेज; पण नाराजी दूर होणार का?

Rahul Gandhi | Hardik Patel | : काँग्रेसमध्ये नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी अवस्था
Hardik Patel | Congress
Hardik Patel | CongressSarkarnama

गांधीनगर : गुजरात काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र पटेल यांची ही नाराजी दूर करण्यासाठी आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सरसावले आहेत. राहुल गांधी यांनी हार्दिक पटेल यांना एक खास मेसेज दिला असून आता पटेल यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

काँग्रेसमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पटेल यांना कामाच्या स्वातंत्र्याबाबत विश्वास देण्यात आला असून लवकरच त्यांना नवी जबाबदारी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच गुजरात काँग्रेसचे प्रभारी आणि इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असलेले मतभेद दूर करण्यासाठी हार्दिक यांच्या संपर्कात राहण्याचे आदेशही राहुल गांधी यांनी पक्षश्रेष्ठींना दिले आहेत. याबाबत काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी माहिती दिली आहे. याशिवाय हार्दिक पटेलांशी पक्षश्रेष्ठींची काय चर्चा झाली याबाबत गुजरात काँग्रेसचे प्रभारी रघू शर्मा हे माहिती देतील, असेही सुरजेवाला यांनी सांगितले.

Hardik Patel | Congress
त्यांना संपवण्याची हीच वेळ, खरी समस्या भोंगे नाही; नितेश राणे आक्रमक

यापूर्वी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर जाहीर टीका आणि भाजपच उघड कौतुक केले होते. तसेच त्यांच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या डीपीमुळेही चर्चांना अधिक हवा मिळाली होती. हार्दिक पटेलांच्या व्हॉट्सअ‍प आणि टेलिग्राम डीपीमधून काँग्रेस गायब झाले होते. त्याजागी भगवे वस्त्र परिधान केलेला फोटो आला होता. अलिकडेच त्यांच्या ट्विटर बायोमधूनही काँग्रेस गायब झाले होते. त्यामुळे हार्दिक पटेल लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आले आहे.

भाजपचे कौतुक करताना काय म्हणाले होते हार्दिक पटेल?

भाजपने मागील काही काळात घेतलेल्या निर्णय राजकीय हेतून घेतले आहेत. असे असले तरी त्यांच्यात निर्णय घेण्याची ताकद आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. भाजपची बाजू न घेता अथवा त्यांची स्तुती न करताही या सत्य गोष्टी आपण स्वीकारायला हव्यात. गुजरातमध्ये काँग्रेसला भक्कम व्हायचे असेल तर आपण निर्णय क्षमता वाढवायला हवी.

Hardik Patel | Congress
राज ठाकरेंच्या इशाऱ्याचा धसका; मशिदींना पोलिसांचे कवच अन् भोंग्याविना अजान

पटेल यांचे काँग्रेसवर आरोप :

पटेल यांनी नुकताच पक्षावर आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप केला होता. नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी पक्षात अवस्था झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांनीच केलेल्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसमधून ते बाहेर पडू शकतात, अशी चर्चा गुजरातमध्ये सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झालं आहे.

Hardik Patel | Congress
अशी विधानं करताना जरा डोकं ठिकाणावर ठेवा; संजय राऊतांचा मनसेवर पलटवार

काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर पटेल यांनी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. ते म्हणाले होते की, मी आतापर्यंत पक्षासाठी १०० टक्के योगदान दिलं आहे. यापुढेही पक्षात काम करत राहीन. आम्ही गुजरातचा चांगला विकास करू. पक्षामध्ये काही आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पण आम्हाला गुजराच्या विकासासाठी एकत्र राहून काम करायचे आहे, असं सांगत पटेल यांनी काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com