Rahul Gandhi Passport : राहुल गांधींना मिळालं नवं पासपोर्ट; अमेरिका दौऱ्याच्या उड्डाणासाठी सज्ज..

Rahul Gandhi Tour to America : अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार..
Rahul Gandhi Passport :
Rahul Gandhi Passport :Sarkarnama

Rahul Gandhi America Tour: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना आज नवीन पारपत्र (पासपोर्ट) मिळाला आहे. स्थानिक न्यायालयाने नवीन सामान्य पारपत्र उपलब्ध होण्यासाठी कसलीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर राहुल गांधी यांनी पारपत्र अखेर उपलब्ध केले आहे. यामुळे त्यांच्या आज अमेरिकेला जाण्याची वाट मोकळी झाली आहे.

राहुल गांधी यांना पारपत्र उपलब्ध केले जाईल, असे आश्वासन पारपत्र कार्यालयाकडून राहुल गांधींना दिले गेले होते. यानंतर आता अखेर राहुल गांधींच्या हातात नवे पारपत्र पडले आहे. राहुल गांधी आज अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत.

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिकोला येथे पोहचणार आहेत. तेथील स्टॅनफोर्ड विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसोबत ते संवाद साधत, चर्चा करणार आहेत. तसेच, वाशिंग्टनमध्येही येथील लोकप्रतिनिधी यांच्याशी देखील ते बातचीत करणार आहेत. येथे त्यांची पत्रकार परिषद पार पडेल.

या दौऱ्याच्या समारोपावेळीही अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात ते सार्वजनिक संमेलनात सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी अमेरिकेच्या तीन शहरांना भेटी देणार आहेत. संसद सदस्यत्व रद्द झाल्याने, आणि न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्यांना आपले पारपत्र जमा केले होते. मात्र आता त्यांना पारपत्र उपलब्ध करून दिल्याने, ते अमेरिकेचा दौरा करू शकणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com