काँग्रेस नेत्या रेणुका चौधरींनी पकडली पोलिसाची कॉलर ; व्हिडिओ व्हायरल

ईडीच्या विरोधात आज दुपारी काँग्रेसतर्फे आंदोलन सुरु होते. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी हटविण्याचा प्रयत्न करीत होते.
काँग्रेस नेत्या रेणुका चौधरींनी पकडली पोलिसाची कॉलर ; व्हिडिओ व्हायरल
renuka chowdhurysarkarnama

हैदराबाद : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्यावरील ईडी कारवाईच्या विरोधात गुरुवारी मुंबईत राजभवनासमोर काँग्रेसची निदर्शने सुरू आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वात राजभवनासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधींना (rahul gandhi) या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवल्याचा आरोप त्यांनी केला. (renuka chowdhury news)

तेलंगणामध्ये अशाच एका आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी (renuka chowdhury) यांनी पोलिस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले. हैदराबादमध्ये रेणुका चौधरी यांनी आंदोलना दरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेणुका चौधरी यांनी पोलिसाची थेट कॉलर पकडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी देशभरात निषेध करण्यात करण्यात आला. बहुतांश राज्यांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते राजभवनांना घेराव करत आहेत. ईडीच्या विरोधात आज दुपारी काँग्रेसतर्फे आंदोलन सुरु होते. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी हटविण्याचा प्रयत्न करीत होते.

या आंदोलनात रेणुका चौधरी यांनी थेट पोलिस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिस, काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रेणुका चोधरी यांना बाजूला केलं. त्यामुळे त्या पोलिस कर्मचाऱ्याची सुटका झाली.

मुंबईत राजभवनासमोर निदर्शने

बुधवारीही काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आणि राहुल गांधींना या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवल्याचा आरोप केला. ईडीच्या कारवाईच्या विरोधात गुरुवारी महाराष्ट्रातही राजभवनासमोर काँग्रेसची निदर्शने सुरू आहेत.काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वात राजभवनासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in