Rahul Gandhi ed inquiry : अनेक खासदारांसह मुख्यमंत्री गेहलोत-बघेल ताब्यात

पोलिसांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेस खासदार रणदीप सिंग सुरजेवाला आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले आहे.
Rahul Gandhi ed inquiry : अनेक खासदारांसह मुख्यमंत्री गेहलोत-बघेल ताब्यात
Rahul Gandhi ed inquiry sarkarnama

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणात तीन तासापासून चौकशी सुरु आहे. ईडी कार्यालयाकडे रवाना होण्यापूर्वी काँग्रेसनं (Congress) दिल्लीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दिल्ल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. प्रियंका गांधींसह (Priyanka Gandhi Vadra) दिल्लीतील ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. यावेळी राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाले होते.

काँग्रेस मुख्यालयातून बाहेर पडलेल्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी रस्त्यातच थांबविले. त्यानंतर या नेत्यांनी रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरु केले. पोलिसांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेस खासदार रणदीप सिंग सुरजेवाला आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना तुघलक रोड पोलिस ठाण्यात येण्यात आले आहे. त्यांना भेटण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या पोलिस ठाण्यात पोहचल्या आहेत.

Rahul Gandhi ed inquiry
ईडी चौकशी : मेव्हण्याच्या समर्थनासाठी भावुक पोस्ट, म्हणाले, 'माझी १५ वेळा चौकशी झाली'

पोलिसांनी मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंह, दीपेंद्र हुडा, पवन खेरा, पीएल पुनिया, गौरव गोगोई, मीनाक्षी नटराजन यांच्यासह काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले आहे. "राहुल गांधींवरील कारवाई बेकायदेशीर आहे. जो कोणी भाजपच्या विरोधात बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाते," असे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

"नॅशनल हेराल्ड कंपनीने यंग इंडिया कंपनीची थकबाकी माफ करून कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले आहे. नॅशनल हेराल्डमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. आम्ही भाजप सरकारप्रमाणे भारतातील सरकारी मालमत्ता विकल्या नाहीत," असे काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी माध्यमांना सांगितलं. "शांततापूर्ण मोर्चा काढण्यात सरकारला काय अडचण आहे," असा सवाल अशोक गेहलोत यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in