Rahul Gandhi : 'आदिवासीच देशाचे खरे मालक; भाजपवाले त्यांना 'वनवासी' बनवताहेत...'

Rahul Gandhi News : राहुल गांधींनी सांगितला काँग्रेस-भाजपमधील फरक...
Rahul Gandhi Latest News
Rahul Gandhi Latest NewsSarkarnama

Rahul Gandhi News : भाजपचे नेते आदिवासींना देशाचे मालक मानत नाहीत. तर ते आदिवासींना 'आदिवासी' न म्हणता 'वनवासी' म्हणतात. हाच काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक असल्याचं काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी म्हटलंय. काँग्रेसने आदिवासींना कायमच चांगलं शिक्षण, रोजगार, आरोग्य देण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेचीही जबाबदारी घेतली असल्याचं सांगत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.

गांधी म्हणाले, ''देशातील अनेक आदिवासी लोकं मला भेटल्यावर सांगतात, आमची जमीन हडप करत सरकार उद्योगपतींना देतेय. कोणत्याही कागदपत्रांची देवाणघेवाण न करता आम्हांला बेघर केलं जातंय. मात्र माझ्या कुटुंबाचं आदिवासी समाजाशी खूप जुनं आणि जवळचं नातं आहे. कारण माझी आजी मला नेहमी सांगायची आदिवासी हेच या हिंदुस्थानचे पहिले आणि खरे मालक आहेत. खरं तर या देशाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आदिवासींचं जीवन, संघर्ष पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल'', असं ते म्हणाले.

Rahul Gandhi Latest News
Tupkar : 'जलसमाधी'साठी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी मुंबईकडे निघणार...

''आदिवासींना भाजपचे (BJP) नेते आदिवासी न म्हणता वनवासी म्हणतात. कारण ते जंगलात राहतात. पण आदिवासींनी शहरात राहावं, इंजिनिअर, डॉक्टर, व्हावं, असं त्यांना वाटत नाही. आदिवासींनी कायम जंगलांत राहावं असंच त्यांना वाटतं. पण असंच सुरू राहीलं तर पुढच्या दहा वर्षात संपूर्ण जंगल उद्योगपतींच्या घशात जाईल. पण काँग्रेस (Congress) नेहमी आदिवासींबरोबर असंल्याचं गांधींनी यावेळी सांगितलं.

Rahul Gandhi Latest News
शिंदे गटाच्या आमदाराचा भाजपला इशारा; अपमान होत असेल तर दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल

दरम्यान, गेल्या ७० दिवसांपासून काँग्रेसची कन्याकुमारी (Kanyakumari) ते श्रीनगर (Srinagar) अशी 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. तर या यात्रेच्या माध्यमातून मी तब्बल २००० किलोमीटर अंतर चाललो आहे. तर यापुढे अजून १५०० किलोमीटर अंतर चालायचं आहे. या यात्रेत माझ्यासोबत हजारो बेरोजगार, शेतकरी, आदिवासी लोकं चालताहेत. कारण या यात्रेत जातीपाती, प्रांत, भाषा असा कोणताही भेदभाव आम्ही करत नाही, तर फक्त आणि फक्त प्रेम जपतो, असं गांधी यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com