Rahul Gandhi : राहुल गांधींनी स्वीकारली लिंगायत पंथाची दीक्षा

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मध्य कर्नाटकातील (Karnataka) चित्रदुर्ग जिल्हा मुख्यालयातील प्रसिद्ध श्री मुरुघराजेंद्र मठाला भेट दिली.
Rahul Gandhi
Rahul Gandhisarkarnama

Rahul Gandhi : बंगळूर : काँग्रेसचे (Congress) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी विविध नेत्यांच्या उपस्थितीत मध्य कर्नाटकातील (Karnataka) चित्रदुर्ग जिल्हा मुख्यालयातील प्रसिद्ध श्री मुरुघराजेंद्र मठाला भेट दिली. या वेळी विविध मठांच्या लिंगायत स्वामींशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. त्यानंतर मुरुघराजेंद्र मठाचे स्वामी शिवमूर्ती मुरुघ शरण यांनी त्यांना लिंगायत संप्रदायाची दीक्षा दिली.

Rahul Gandhi
Ed Action : ईडीची मोठी कारवाई : नॅशनल हेराल्डच्या कार्यालयाला ठोकले टाळे

''जगद्‍गुरू मुरुघराजेंद्र विद्यापीठाला भेट देणे आणि डॉ. श्री शिवमूर्ती मुरुघ स्वामी यांच्याकडून ‘इष्टलिंग दीक्षा’ घेणे हा अत्यंत सन्मान आहे'' असे गांधी यांनी ट्विट केले. जगद्‍गुरू बसवण्णांची शिकवण चिरंतन आहे आणि मठाच्या स्वामींकडून त्याबद्दल अधिक जाणून घेण्यास मी नम्र आहे, असे ते पुढे म्हणाले.

Rahul Gandhi
बंड थंड करण्याची ताकद माझ्यात आहे; ठाकरेंचा इशारा

आज या ऐतिहासिकप्रसंगी मुरुघ स्वामी यांनी राहुल गांधींना 'इष्टलिंग दीक्षा' दिली. हा एक विलक्षण क्षण आहे, असे मठाच्या अधिकाऱ्याने सांगितले. स्वामींनी राहुल गांधींच्या गळ्यात 'शिवलिंग' घातले आणि त्यांच्या कपाळावर 'विभूतीं'ची तीन बोटे ओढली, असे कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने निवेदनात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com