Raghuram Rajan : दोन भारत तयार होत आहे का? रघुराम राजन म्हणाले...

Raghuram Rajan With Rahul Gandhi : जगात सर्वत्र द्वेष पसरला आहे. युक्रेनपासून अनेक ठिकाणे पाहिल्यास हे दिसून येईल.
Raghuram Rajan With Rahul Gandhi
Raghuram Rajan With Rahul GandhiSarkarnama

Raghuram Rajan With Rahul Gandhi : आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मध्यमवर्गीयांच्या हितासाठी धोरणे बनवण्याची बाजूने भूमिका घेतली आहे. राजन यांनी भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेतही सहभाग घेतला होता. काँग्रेस खासदार राहुल गांधीच्या भेटी दरम्यान रघुराम राजन यांची वर्तमान आणि भविष्यातील आर्थिक समस्यांवर राहुल गांधीनी मुलाखत घेतली आहे.

राहुल गांधी राजन यांना म्हणाले, जगात सर्वत्र द्वेष पसरला आहे. युक्रेनपासून अनेक ठिकाणे पाहिल्यास हे दिसून येईल. भारत देश जगाला यामध्ये एक दिशा देऊ शकतो. भारत मोठी भूमिका बजावू शकतो. यावर उत्तर देतान राजन म्हणाले की, लोकशाही हीच आमची ताकद आहे. भारत एक आदर्श ठेवू शकेल, असे अनेक देश आमच्याकडे बघत आहेत.

राजन पुढे म्हणाले की, आगामी काळात सेवा क्षेत्रात क्रांती होणार आहे. आज भारतात बसून अमेरिकेत काम करता येते आम्ही भांडवलशाहीच्या विरोधात असू शकत नाही, कोरोनाच्या काळात व्यवसाय बंद झाल्यामुळे गरीब आणि श्रीमंतांमधील विषमता आणखी वाढली आहे. मध्यमवर्गाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे, गरिबांना रेशन मिळते. श्रीमंतांना कोरोनाकाळात झळ पोहचली नाही. आपण मध्यमवर्गाकडे पाहिले पाहिजे, त्यांच्यासाठी धोरणे बनवली पाहिजेत. आम्ही भांडवलशाहीच्या विरोधात नाही.

रघुराम राजन यांच्यासोबत राहुल गांधींचे प्रश्नोत्तरे :

राहुल गांधी : तुम्ही ग्रामीण राजस्थान बघायला आलात का?

राजन : मी नीमराणाजवळचं गाव पाहिलं होतं. तिथे किती कारखाने आले आहेत, किती विकास झाला आहे. गावाचा कायापालट दिसत आहे.

राहुल गांधी : आजच्या अर्थव्यवस्थेकडे तुम्ही कसे पाहता?

राजन : या वर्षी प्रचंड अडचणी आल्या. भारताची निर्यात कमी आहे. जीवनाश्यक वस्तूंची महागाई वाढते आहे. महागाई हा विकासाचा अडथळा आहे. कोरोना नंतर, समस्या वाढल्या आणि आपला विकास दर कमी झाला. कोरोना संकटापूर्वीही आपला विकासदर कमी होता.

राहुल गांधी : देशात चार-पाच भांडवलदार सतत श्रीमंत होत आहेत. दोन भारत निर्माण होत आहेत, एक शेतकरी आणि गरीब आणि दुसरा या पाच-सहा भांडवलदारांचा. या वाढत्या विषमतेबद्दल आपण काय करावे?

राजन : ही एक मोठी समस्या आहे. कोरोनाच्या काळात श्रीमंत वर्गाचे उत्पन्न वाढले, कारण ते घरून काम करू शकत होते, परंतु गरीब लोकांना कारखान्यात जावे लागले, जे बंद होते. कारखाना बंद पडल्याने मासिक उत्पन्न बंद झाले. त्यामुळे ही विषमता आणखी वाढली आहे.

Raghuram Rajan With Rahul Gandhi
Gram panchayat election 2022: कोण आला रे कोण आला...गुवाहाटीचा चोर आला....कुमठेत भाजप, राष्ट्रवादीत राडा...

राहुल गांधी : दुसरी हरित क्रांती होऊ शकते का?

राजन : दुसरी हरित क्रांती नक्कीच होऊ शकते. आता नव्या पद्धतीने विचार करायला हवा. प्रक्रियेकडे लक्ष द्या. इथले श्रम स्वस्तात वापरावेत. शेतात प्रक्रिया युनिट बसवाव्यात, त्यामुळे ऊर्जेची बचत होईल, वीज आणि डिझेलचा वापर कमी होईल.

राहुल गांधी : अमेरिका आणि बाकी जगात काय चाललंय?

राजन : अमेरिकेत महागाई वाढत आहे. केंद्रीय बँका व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे भारतातून होणारी निर्यात कमी होईल. आमची उत्पादन गती कमी होईल.

राहुल गांधी : मी महाराष्ट्रातून गेलो तेव्हा तिथले लोक म्हणत होते की, बांगलादेशने निर्यात धोरणाने खूप काही केले आहे, त्याबद्दल आपण काय करावे?

राजन: त्यांचा एक महत्त्वाचा उद्योग कापड आहे, ते कपडे बनवतात आणि विकतात. बांगलादेशने मोठ्या उद्योगांना परवानगी दिली आहे. कामगार महिला आहेत. भरती मोठ्या प्रमाणावर झाली.

राहुल गांधी : बेल्लारीमध्ये जीन्स उत्पादनाचे मोठे केंद्र आहे, ते मोठे काम होते. तेथे साडेचार लाखांहून अधिक लोक या कामात गुंतले होते. घरांमध्ये जीन्स शिवायचे काम चालत असे. जीएसटी, नोटाबंदीने सर्व काही संपले. हा इंग्रजांच्या काळापासूनचा उद्योग आहे. आज केवळ 50 हजार तिथे उरले आहेत.

राजन : या क्षेत्राला स्वस्त कर्ज दिले पाहिजे. सरकारी धोरणात नियमितता असली पाहिजे.

राहुल गांधी: भारतात अशी एकही कंपनी नाही जी आधी छोटी होती आणि आता मोठी झाली आहे. अमेरिकेत छोटी कंपनी पाच-सात वर्षांत मोठी होते. भारतात हे का होत नाही?

राजन : तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. वाढीसाठी संधी हवी. जेव्हा तुम्ही उद्योग वाढीसाठी सुरुवात करता, तेव्हा सरकार लहान व्यवसायांना वाढण्यास मदत करते.

राहुल गांधी : हल्दीराम हे लघुउद्योग वाढवण्याचे सर्वात मोठे उदाहरण?

राजन : आम्हाला अनेक हल्दीरामांची गरज आहे. लहान फर्म मोठा रोजगार देऊ शकतात.

राहुल गांधी : शेतकरी म्हणतात की, त्यांची पिके येताच वाणिज्य मंत्रालय निर्यात-आयात धोरण ठरवते आणि त्यांच्या पिकांचे भाव पडतात?

राजन : ही मोठी समस्या आहे, आम्ही शेतकर्‍यासाठी आहोत असे सांगत राहतो, पण निर्यात-आयात धोरण त्यांच्यासाठी नाही. कांद्याचे भाव वाढतात, भाव पडतात, गरीब शेतकरी त्रस्त होतो. निर्यात आयातीचे शाश्वत धोरण असावे. भाव जास्त वाढले तर आयात करू शकता, निर्यातीवर बंदी नको, कारण शेतकऱ्याचे नुकसान होते.

राहुल गांधी : बेरोजगारी ही मोठी समस्या आहे, त्यावर उपाय काय?

राजन गांधी: लोकांना सरकारी नोकऱ्या हव्या आहेत, कारण नोकरीची सुरक्षितता आहे, पण खूप कमी लोक सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करू शकतात. सरकारमध्ये केवळ 1 टक्के रोजगार उपलब्ध होईल. आपल्याला खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन द्यावे लागेल. खासगी क्षेत्र आणि कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणले तर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. सेवा क्षेत्राकडे पाहिले पाहिजे, तेथे रोजगार निर्माण होईल. कोरोनाच्या काळात अनेक मुले शाळेत गेली नाहीत, ती त्यांच्या वर्गात तीन वर्षे मागे आहेत. याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.

Raghuram Rajan With Rahul Gandhi
Gram panchayat election 2022: कोण आला रे कोण आला...गुवाहाटीचा चोर आला....कुमठेत भाजप, राष्ट्रवादीत राडा...

राहुल गांधी : पहिली श्वेतक्रांती, हरितक्रांती, संगणक क्रांती झाली, पुढे काय क्रांती होऊ शकते?

राजन : भविष्यात सेवा क्रांती होईल. आपण अमेरिकेत न जाता अमेरिकेत काम करू शकतो. टेलीमेडिसिनद्वारे डॉक्टर अमेरिकेत बसून उपचार देऊ शकतात. आपल्याला आता नव्या प्रकारच्या हरितक्रांतीची गरज आहे. आपल्याकडे अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.

राहुल गांधी : माझी संसदेच्या सुरक्षा रक्षकांशी मैत्री आहे, मी विचारले तुम्ही काय करता? तो म्हणाला की त्याला काम करताना खूप मजा येत आहे, त्याने स्टॉक खरेदी केले आहेत, तो त्यात पैसे कमवत आहे. पगारदार वर्ग स्टॉकमध्ये पैसे गुंतवताना धोका असतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकही शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. नवीन किरकोळ गुंतवणूकदार येत आहेत, तुम्हाला काय वाटते?

राजन: त्यांना यातला धोका समजत नाही. त्यांच्याकडे पैसे कमी आहेत, परतावा चांगला आहे म्हणून ते इथेही गुंतवणूक करत आहेत. चांगल्या परताव्याचे कारण काय ते त्यांना दिसत नाही. क्रिप्टो अमेरिकेत घडले, त्याचा परतावा आश्चर्यकारक होते. बिटकॉइन दोन ते तीन डॉलरवरून 67 हजार डॉलरवर गेले, नंतर खाली आले. बहुतेक गरीब लोक जेव्हा किंमती उच्च पातळीवर असतात, तेव्हा खरेदी करतात, मात्र श्रीमंत लोक त्या वेळी विकतात.

राहुल गांधी : मजा येत आहे का?

राजन: अगदी, मजा येत आहे. जातीय सलोखा आणि शांततेसाठी तुम्ही पदयात्रेला जात आहात, ही देशाची गरज आहे. भारताला संघटित व्हायला हवे.

राहुल : शांतता, बंधुभाव फायद्याचा आहे का?

राजन : दोन भावांमधील भांडणात घर टिकू शकत नाही, असे तुम्ही भाषणात सांगितले होते. अनेकजण अल्पसंख्याकांना दडपण्याच्या प्रयत्नात असतात.

राहुल गांधी : आजच्या जगात सर्वत्र द्वेष पसरला आहे. युक्रेनपासून अनेक ठिकाणे पाहिल्यास भारत जगाला यामध्ये दिशा देऊ शकतो. भारत मोठी भूमिका बजावू शकतो.

राजन : लोकशाही ही आपली ताकद आहे. भारत एक आदर्श ठेवू शकेल, असे अनेक देश आपल्याकडे बघत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com