Raghuram Rajan : रघुराम राजन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार?

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी बुधवारी (14 डिसेंबर) भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.
Raghuram Rajan At Bharat Jodo Yatra
Raghuram Rajan At Bharat Jodo YatraTwitter@Bharat Jodo

Raghuram Rajan news : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी बुधवारी (14 डिसेंबर) भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. यादरम्यान कॉंग्रेस खासदार राहुल गांधींसोबत ते पायी चालताना दिसले. यावरुन आता नव्या चर्चांना उधाण आले आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता राजस्थानमध्ये पोहोचली आहे. राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजनही सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या यात्रेची सुरुवात झाल्यापासून काँग्रेस पक्षाचे सदस्य नसलेले हजारो लोक या यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत. रघुराम राजन हेदेखील बुधवारी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर आता नवीन चर्चांना उधाण आले आहे. रघुराम राजन काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाले आहेत.

Raghuram Rajan At Bharat Jodo Yatra
Karnataka Maharashtra Dispute : सीमाप्रश्न अमित शाहांच्या कोर्टात : तोडगा निघणार?

खरे तर रघुराम राजन यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अनेक धोरणांवर टीका केली आहे. केंद्रातील मोदी सरकार देशाशी खोटे बोलत असल्याचा आरोप रघुराम राजन यांनी केला होता. सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही, परंतु तरीही सरकार सत्य स्वीकारण्यास तयार नाही आणि या प्रश्नाचे गांभीर्य सातत्याने कमी करत असल्याचे राजन म्हणाले होते. इतकेच नव्हे तर आर्थिक मंदीच्या समस्येवर मात करण्यासाठी मोदी सरकारला ही समस्या मान्य करावी लागेल कारण ती लपवून ठेवल्याने परिस्थिती सुधारणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.

कोण आहेत रघुराम राजन

1963 मध्ये भोपाळ, मध्य प्रदेश येथे जन्मलेले रघुराम राजन हे भारताचे 23 वे RBI गव्हर्नर आहेत. RBI मधील त्यांच्या कार्यकाळात, रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय सेटलमेंटसाठी बँकेचे उपाध्यक्ष देखील राहिले आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात 2013 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारलेले राजन नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात 2016 पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. यानंतर उर्जित पटेल आरबीआयचे गव्हर्नर झाले. रघुराम राजन यांनी आयआयटी दिल्लीमधून बीटेक आणि आयआयएम अहमदाबादमधून व्यवस्थापन पदवी आणि एमआयटीमधून पीएच.डी. केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in