लस प्रमाणपत्रासोबतच कोरोना मृत्यू प्रमाणपत्रांवरही मोदींचा फोटो छापा! भाजपच्या घटक पक्षाची मागणी

कोरोना संकटाच्या हाताळणीत मोदी सरकार अपयशी झाल्याचा ठपका ठेवला जात आहे. आता भाजपच्या घटक पक्षानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे.
put narendra modi photo on covid death certificates says nda ally
put narendra modi photo on covid death certificates says nda ally

नवी दिल्ली : कोरोनाचा (Covid-19) संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण (Covid Vaccination) मोहीम  सुरू आहे. परंतु, लशीच्या टंचाईमुळे या मोहिमेचा फज्जा उडाला आहे. यातच कोरोना संकटाच्या हाताळणीत मोदी सरकार अपयशी झाल्याचा ठपका ठेवला जात आहे. आता भाजपच्या घटक पक्षानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर हल्ला चढवला आहे. लसीकरण प्रमाणपत्रासोबत कोरोना मृत्यू प्रमाणपत्रांवरही मोदींचा फोटो छापावा, अशी मागणी हिंदुस्तानी आवामी मोर्चाने (HAM) केली आहे. 

हिंदुस्तानी आवामी मोर्चा हा बिहारमध्ये भाजपचा सहकारी पक्ष आहे. पक्षाचे अध्यक्ष व बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो असेल तर कोरोना मृतांच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापावा, अशी मागणी त्यांनी केली. 

याविषयी बोलताना मांझी म्हणाले की, तुम्हाला लसीकरण प्रमाणपत्रावर एवढीच फोटो छापण्याची हौस असेल तर कोरोना मृतांच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही फोटो छापावा. चांगल्या गोष्टींबद्दल जर तुम्हाला श्रेय घ्यायचे असेल तर लोकांच्या मृत्यूबद्दलही तुम्हीच शिव्या खा. यासाठी इतरांनी शिव्या का खाव्यात? 

मांझी यांनी कोरोना लशीचा दुसरा डोस 23 मे रोजी घेतला. यानंतर त्यांनी ट्विटर म्हटले होते की, मला कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर लसीकरण प्रमाणपत्र मिळाले. त्यावर मोदींचा फोटो होता. आपल्या देशाचे घटनात्मक प्रमुख हे राष्ट्रपती आहेत. त्यामुळे प्रमाणपत्रावर राष्ट्रपतींचा फोटो असायला हवा होता. तुम्हाला फोटोच टाकायचे असतील राष्ट्रपती, पंतप्रधान स्थानिक मुख्यमंत्र्यांचेही फोटो टाकावेत. 

सध्या देशभरात कोविशिल्डसह कोव्हॅक्सिनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ठराविक अंतरात डोस देणे गरजेचे असल्याने बहुतेक राज्यांनी दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जात आहे. तर काही राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण थांबवले आहे. देशभरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. अनेक राज्यांनी लस कंपन्यांशी बोलणी करुनही त्यांना लस मिळत नसल्याचे चित्र आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in