पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचे अपघाती निधन; शेतकरी आंदोलनाशी 'असा' आहे संबंध

Panjab| Deep Sidhu | Road Accidet दीप सिद्धू आपल्या काही मैत्रिणींसह दिल्लीहून पंजाबला जात होता.
Punjabi actor Deep Sidhu dead in a road accident
Punjabi actor Deep Sidhu dead in a road accidentSarkarnama

पंजाबी अभिनेता दीप सिद्धू (Deep Sidhu) याचा मंगळवारी (१५ फेब्रुवारी) एका रस्ते अपघातात निधन झाले. तो ३७ वर्षांचा होता. स्कॉर्पिओ गाडीने जात असताना कुंडली सीमेजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्याची कार धडकली. स्कॉर्पिओ चालवत असताना अचानक दीप सिद्धूला तेथे उभा असलेला ट्रक दिसला. ट्रकला धडकू नये म्हणून त्याने कार वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची कार ट्रकला धडकली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाली आहे. (Punjabi actor Deep Sidhu dead in a road accident)

Punjabi actor Deep Sidhu dead in a road accident
भुर्रर्रर्र...! निमगावच्या घाटात धुरळा उडणार, अमोल कोल्हे घोडी धरणार

मिळालेल्या माहितीनुसार, दीप सिद्धू आपल्या काही मैत्रिणींसह दिल्लीहून पंजाबला जात होता. कुंडली-मानेसर-पलवल द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला. दीप सिद्धूच्या स्कॉर्पिओचा अपघात झाला तेव्हा त्याच्यासोबत त्याच्या मैत्रिणीही होत्या. अपघाताच्या वेळी दीप सिद्धू स्वतः कार चालवत होता, त्याची एक मैत्रिण त्याच्या शेजारच्या सीटवर बसली होती. समोर ट्रक असल्याचे पाहताच त्याने स्कॉर्पिओ वळवत मैत्रिणींना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कारची ती बाजू ट्रकला धडकली नाही. पण दिप या अपघातात गंभीर जखमी झाला होता, त्यानंतर तातडीने त्याला सोनीपत येथील खारखोंडा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्याच्या निषेधार्थ आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली तेव्हा दीप सिद्धू चर्चेत आला. त्यावेळी काही लोकांनी लाल किल्ल्यावर चढून धार्मिक ध्वज लावला. या प्रकरणात दीप सिद्धू यांच्यावर आंदोलकांना भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. शेतकरी चळवळीत आपला वाटा दिला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

दीप सिद्धू याचा जन्म 2 एप्रिल 1984 रोजी पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यात झाला. त्याचे वडील सरदार सुरजित सिंग हे वकील होते. दीप सिद्धू अवघ्या 4 वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. दीप सिद्धूने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्याने कायद्याचेही शिक्षण घेतले होते. तो किंगफिशर मॉडेल हंटचा स्पर्धेचा विजेता होता. मिस्टर इंडिया स्पर्धेतही त्याने मिस्टर पर्सनॅलिटीचा किताब पटकावला. 2015 मध्ये त्याचा पहिला पंजाबी चित्रपट 'रमता जोगी' रिलीज झाला. 2018 च्या जोरा दास नंबारिया चित्रपटातील अभिनयाने त्याला प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात त्याने एका गँगस्टरची भूमिका साकारली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com