पंजाबमध्ये कॉग्रेसची परीक्षा ; २२ जिल्ह्यात ११७ जागांसाठी मतदानाला सुरवात

मतदानापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांनी शिवमंदीरात पूजा केली. ते कटलगढ़ साहिब गुरुद्वारा येथे पोहचले आहेत.
punjab election
punjab electionsarkarnama

नवी दिल्ली : पंजाबमधील २२ जिल्ह्यातील सर्व ११७ जागांवर आज मतदान (punjab election)होत आहे. पंजाबमध्ये एकाच टप्यात मतदान होत आहे. कॉग्रेस सत्ता वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर भाजपने कॉग्रेसला धूळ चारण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत भाजप हा शिरोमणी अकाली दलापासून वेगळा झाला आहे. तर कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh)नवे राजकीय भागीदार म्हणून भाजपसमोर उभे ठाकले आहेत.

मतदानापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांनी शिवमंदीरात पूजा केली. ते कटलगढ़ साहिब गुरुद्वारा येथे पोहचले आहेत. ते चमकैार साहिब आणि भदैार विधानसभा येथून निवडणूक लढवित आहेत. सकाळपासून मतदानाला सुरवात झाली आहे. मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टि्वट करीत आव्हान केले आहे की, आज उत्तरप्रदेश आणि पंजाबमध्ये मतदान होते आहे. सर्वांनी मोठी संख्येने मतदान करावे. विशेषत: जे युवक पहिल्यांदाचा मतदान करीत आहेत. त्यांना माझे आव्हान आहे, की सर्वांनी मतदान करावे.

punjab election
रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है ; राऊतांनी भाजप नेत्यांना सुनावलं

पंजाबमध्ये आम आदमी पक्षानेही जोरदार प्रयत्न करीत कडवे आव्हान उभे केले आहे. राज्यातील ३५ जागा या अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत. सुखबीर बादल (अकाली दल), 202 कोटी, करन कौर, (कांग्रेस) 155 कोटी, कुलवंत सिंह, (आप) 238 कोटी असे हे तीन उमेदवार सर्वाधिक श्रीमंत आहेत.

शिरोमणि अकाली दल (शिअद) 97 व बहुजन समाज पार्टी (बसपा) 20 जागांवर निवडणूक लढवित आहे. शिअद-बसपा यांची युती आहे. सुखबीर बादल हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत.

punjab election
मरण पत्कारेन पण शरण जाणार नाही ; राऊतांचा मोदींवर निशाणा

पंजाबमध्ये काँग्रेस, आप, शिरोमणी अकाली दल- बसप, भाजप आणि संयुक्त समाज मोर्चाप्रमाणे विविध संघटना आणि पक्ष मैदानात उतरले आहेत. पंजाबमध्ये २ कोटी १४ लाख मतदार असून ते १ हजार ३०४ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील, यावेळी ९३ महिला उमेदवार देखील मैदानात उतरल्या आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, आपचे भगवंत मान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि प्रकाशसिंग बादल आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल आदी दिग्गज मंडळी निवडणूक लढवीत आहेत.

उत्तरप्रदेशात सोळा जिल्ह्यात ५९ मतदारसंघांमध्ये मतदान

उत्तरप्रदेशात (up election)तिसऱ्या टप्प्यातील ५९ जागांसाठी आज (ता.२०) मतदान होणार होत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये बहुरंगी लढत पाहायला मिळत आहेत. पंजाबमध्ये काँग्रेस तर उत्तर प्रदेशात भाजप सत्ताधीश आहे. पंजाबमध्ये साधारणपणे सकाळी आठ ते सायंकाळी सहादरम्यान तर उत्तरप्रदेशात सकाळी सात ते सायंकाळी सहादरम्यान मतदान होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सर्व ठिकाणची मतमोजणी १० मार्च रोजी पार पडेल.

उत्तरप्रदेशात सोळा जिल्ह्यांतील ५९ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडणार आहे. येथे ६२७ उमेदवार मैदानात असून २ कोटी १५ लाख लोक मतदानाचा हक्क बजावतील. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या करहाल मतदारसंघात याच टप्प्यात मतदान होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com