मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळीच दुसरीकडे डीजे लावा! पोलिसांचा वादग्रस्त आदेश

राज्य पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी डीजे लावण्याचा दिलेला आदेश वादग्रस्त ठरला आहे.
Charanjit Singh Channi
Charanjit Singh ChanniSarkarnama

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) धुरा चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी हाती घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चन्नी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने (Congress) जोरदार मोहीम हाती घेतली आहे. असे असतानाच राज्य पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी डीजे लावण्याचा दिलेला आदेश वादग्रस्त ठरला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीमुळे मुख्यमंत्री चन्नी यांनी राज्यभरात कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी दुसरीकडे लाऊडस्पिकरवर धार्मिक गाणी वाजवा, असा आदेश पंजाब पोलिसांनी काढला आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना हा आदेश काढण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांसोबत डीजे लावण्याच्या अतिरिक्त उपाययोजना करण्याचे निर्देश पोलीस दलाने दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी काही संघटना निदर्शने अथवा आंदोलन करतात. त्यांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचू नयेत, यासाठी हा निर्णय पोलीस दलाने घेतला आहे. धार्मिक गाणी वाजवल्याने आंदोलकांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचणार नाही आणि भाषणात व्यत्यय येणार नाही, असा पोलीस दलाचा होरा आहे. या आदेशामुळे वाद निर्माण झाला असून, पोलीस दल टीकेचे धनी बनले आहे.

Charanjit Singh Channi
आर्यन खानने पुन्हा घेतली उच्च न्यायालयात धाव

चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा यांच्यासोबत काँग्रेस हाय कमांडने सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी हे दोन उपमुख्यमंत्री दिले आहेत. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता.

Charanjit Singh Channi
धारावीत पोचला ओमिक्रॉन! आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले

पंजाब काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ वाद सुरू होता. अमरिंदरससिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू होता. यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेला. सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने अमरिंदरसिंग यांना शह बसण्यास सुरवात झाली. यातून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात झाली होती. अखेर अमरिंदरसिंग यांनी पक्ष सोडून नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com