Punjab News : खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला अटक? ; इंटरनेट सेवा बंद!

Amrutpal Singh News : पंजाब पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
Amrutpal Singh News : Punjab News :
Amrutpal Singh News : Punjab News :Sarkarnama

Punjab News : वारिस पंजाब दे चा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी नकोदर येथून ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. पंजाब पोलिसांची सुमारे 60 वाहने अमृतपाल सिंगच्या मागे लागली होती, अथक प्रयत्नानंतर अमृतपाल सिंगला पकडण्यात आले असल्याचा दावा करण्यात येत आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.

Amrutpal Singh News : Punjab News :
High Court News : करूणा मुंडेंवर दाखल गुन्ह्यातील फिर्यादीसह पोलिसांना खंडपीठाची नोटीस..

पंजाबमध्ये इंटरनेट बंद :

पंजाबमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. अमृतपालच्या अटकेमुळे वातावरण बिघडू नये, म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. एसएमएस पाठोपाठ पंजाबमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा आणि डोंगल सेवाही बंद करण्यात आली आहे.

उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील परिस्थिती बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पंजाब पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पंजाब पोलिसांनी ट्विट केले की, पंजाब पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काम करत आहेत.

Amrutpal Singh News : Punjab News :
Fadanvis : फडणवीस म्हणाले, तोडगा निघाला म्हणून तर बसेस गेल्यात ना…

अमृतपालच्या गावाला वेढा घातला :

अमृतपालचे गाव पूर्णपणे सील करण्यात आले आहे. अमृतपालचे अमृतसरमधील जल्लूपूर खेडा हे गाव निमलष्करी दलाने सील केले आहे. संपूर्ण फोर्सने गावाला वेढा घातला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com