Panjab Election 2022 निवडणूकीच्या तोंडावर नवज्योत सिंग सिद्धूंवर फौजदारी गुन्हा दाखल

Navjyot Singh Sidhu|Panjab Election 2022 नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
Navjyot Singh Sidhu
Navjyot Singh Sidhu

चंदीगड : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. पण पंजाब निवडणुकीच्या एक दिवस आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) अडचणीत सापडले आहेत. सिद्धू यांनी पोलिस कर्मचार्‍यांवर केलेल्या वक्तव्यानंतर डीएसपी दिलशेर सिंह चंदेल (DSP Dilsher Chander) यांनी सिद्धू यांच्यावर फौजदारीचा खटला दाखल केला आहे. (Panjab Election latest news)

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या (Punjab Elections) 117 जागांसाठी रविवारी (२० फेब्रुवारी) मतदान होत आहे. मात्र पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांच्या अडचणी वाढतानाच दिसत आहेत. नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र मतदानाच्या तोंडावरच चंदीगड पोलिसांनी सिद्धूंविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे.

Navjyot Singh Sidhu
मनसेचं 'मराठी कार्ड' ; राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना सूचना

सिद्धू यांनी पोलिसांवर केली होती टिप्पणी?

पंजाबच्या माजी मंत्री अश्विनी सेखड़ी यांच्या रॅलीदरम्यान डिसेंबर 2021 मध्ये नवज्योत सिंग सिद्धूंनी पंजाब पोलिसांवर आक्षेपार्ह टीपण्णी केली होती. अश्विनी सेखड़ी यांनी एक धक्का मारला तर पोलिसांची पॅंट ओली होते, असे विधान त्यांनी केले होते. त्यावर त्यांना विचारले असता त्यांनी त्यांनी आपण केवळ गंमतीनेच बोललो. पण आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला. असेही सिद्धू म्हणाले. यानंतर डीएसपी दिलशेर सिंह चंदेल यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना नोटीस पाठवून मानहानीचा खटला दाखल केला आहे.

यापूर्वी सुलतानपूर लोधी येथील नवतेज सीमा यांच्या रॅलीतही सिद्धूने असेच आक्षेपार्ह विधान केले होते, त्यावेळीही डीएसपी दिलशेर सिंह चंदेल यांनी त्यांच्या विधानाला विरोध केला होता. शिरोमणी अकाली दलाचे माजी मंत्री दलजित सिंग चीमा म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब पोलिसांविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली होती. पण पोलिसांबाबत केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्यावर दिलशेर सिंह यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना मानहानीची नोटीसही पाठवली होती.

चंदीगड पोलिसांचे डीएसपी दिलशेर सिंग चंदेल यांनी अधिवक्ता डॉ. सूर्य प्रकाश यांच्यामार्फत सेक्टर 43 येथील जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी अमन इंदर सिंग यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. यापूर्वी डीएसपी चंदेल यांनी सिद्धू यांच्याविरोधात मानहानीची नोटीस देऊन जाहीर माफी मागण्याची मागणी केली होती, मात्र त्यांनी माफी न मागितल्यामुळे त्यांच्यावर हा खटला दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com