Punjab Congress:सिद्धुंचे शक्तीप्रदर्शन, पुन्हा सक्रीय ; प्रदेशाध्यक्षपदासाठी २४ नेत्यांची बैठक

आमदार नवतेज सिंह चीमा यांच्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात पंजाब कॉग्रेसमधील २४ नेते उपस्थित होते.
Navjotsingh Sidhu
Navjotsingh Sidhu Sarkarnama

अमृतसर : नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसने सपाटून मार खाल्यानंतर आता कॉग्रेसने (Punjab Congress) आत्मचिंतनपर बैठकांचा सपाटा लावला आहे. पुन्हा एकदा नवज्योत सिंग सिद्धु (Navjot Singh Sidhu) यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करा, या मागणीने जोर पकडला आहे. शनिवारी कपूरथला येथील सुल्तानपुर लोधी येथे सिद्धु यांच्यासमवेत कॉग्रेसच्या दोन डझन नेत्यांनी बैठक झाली.

या बैठकीनंतर आमदार सुखपाल खेडा म्हणाले, ''कॉग्रेसमध्ये पुन्हा चैतन्य आणण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नवज्योत सिंग सिद्धु यांना पुन्हा अध्यक्ष करण्यावर यावेळी उपस्थितांचे एकमत झाले,'' विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर कॉग्रेसने आमदार सुखपाल खेडा यांना विरोधीपक्ष नेता बनविण्यासाठी तयारी केली आहे. इंडियन एक्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Navjotsingh Sidhu
हिंसाचार प्रकरणी दिग्विजय सिंह यांना एक वर्षाची शिक्षा

सुल्तानपुर लोधी येथे आमदार नवतेज सिंह चीमा यांच्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात समविचारी २४ पंजाब कॉग्रेसचे नेते उपस्थित होते. या बैठकीला आमदार, माजी आमदार, नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील उमेदवार, पंजाब कॉग्रेसचे कमिटीचे माजी अध्यक्ष उपस्थित होते. त्यानंतर सिद्धु यांनी टि्वट केले.

''चांगला विचार घेऊन आम्ही जनतेच्या अधिकारांसाठी लढणार,'' असे सिद्धु यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. ''निवडणुकीत मतदारांनी दिलेला कैाल, पक्षातील आवश्यक बदल, पात्रता, प्रामाणिकपणा याआधारे भविष्यात निर्णय घेण्यात येणार आहे, असा आम्हाला विश्वास आहे,'' असे टि्वट खैरा यांनी केलं आहे.

Navjotsingh Sidhu
मंत्र्यांना अडचणीत कोण आणते..गडकरींनी सांगितली ही तीन नावे..

पंजाबमधील कॉग्रेसच्या दारुण पराभवानंतर कॉग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्ध यांचा राजीनामा घेतला आहे.पराभवाचे आत्मचिंतन करुन भविष्यात कॉग्रेसची काय रणनीती असेल याबाबत सध्या कॉग्रेसच्या बैठका सुरु आहेत. या बैठकाच्या माध्यमातून सिद्धु आपली गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

गेले काही दिवस मैानात असलेले सिद्धु पुन्हा सक्रीय होण्याचे चिन्ह आहे. पण प्रदेशाध्यक्ष पदासाठी अमरिंदर सिंह, राजा वडिंग, सुखजिंदर सिंह रंधावा आणि प्रताप सिंह बाजवा हेही इच्छुक आहेत. यातील एकाला विरोधीपक्षाची जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिद्धु यांच्याकडे कुठली जबाबदारी पक्षश्रेष्ठी देणार हे लवकरच समजेल. तर दुसरीकडे नवज्योत सिंह सिद्धु निवडणुकीत 'आऊट' झाल्यानंतर आता आम आदमी पक्षाने माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला राजकारणाच्या मैदानात उतरविले आहे. आपने हरभजनसिंगला राज्यसभेत खासदार म्हणून पाठविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com