काँग्रेसची पडझड सुरू; माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

वीस माजी मंत्री, आमदार, खासदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
BJP, Congress
BJP, Congress

Sarkarnama

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) फोडाफोडीचे राजकारण सुरू केलं आहे. पंजाबमध्ये (Punjab) पुढील आठवडाभरात एक-दोन नव्हे तर 15 ते 20 माजी कॅबिनेट मंत्री, आमदार, खासदार, सेलिब्रिटी भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्याची सुरूवात मंगळवारी झाली असून काँग्रेसच्या (Congress) आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाची आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत आघाडी झाली आहे. त्यातच आता निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत. याची सुरूवात मंगळवारी झाली असून माजी मंत्री व आमदार राणा गुरमित सिंग सोधी (Rana Gurmit Singh Sodhi) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

BJP, Congress
ममतांची जादू पुन्हा चालली; महापालिका निवडणुकीतही भाजपाचा सुफडा साफ होणार

विशेष म्हणजे सोधी हे अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळात क्रीडा मंत्री होते. चरणजितसिंग चन्नी यांच्या सरकारमधून त्यांना डच्चू देण्यात आला होता. तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा होती. निवडणुकीच्या तोंडावर ते अमरिंदरसिंग यांच्यासोबत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान, सोधी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनाम्याचं पत्र लिहिलं आहे. पंजाब काँग्रेसमधील वादामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. याचा फटका पक्षासह राज्यालाही बसत आहे. सध्याच्या स्थितीत पक्षात माझी कोंडी होत असून मी हतबल झालो आहे. पक्षाने राज्याची सुरक्षा व सामाजिक शांतता पणाला लावली आहे. स्वत:च्या फायद्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते हे करत असल्याचा आरोप सोधी यांनी केला आहे.

दरम्यान, 'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेससह (Congress) आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल (SAD) व राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमधील हे सर्व नेते आहेत. त्यामध्ये चार प्रसिध्द गायकांचाही समावेश आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder singh) स्वतंत्र चूल मांडत भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यांची आघाडी पंजाबमध्ये काँग्रेस व अकाली दलाला टक्कर देणार आहे.

अमरिंदरसिंग यांचे अनेक समर्थक काही माजी मंत्री व विद्यमान आमदारांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमरिंदरसिंग काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सुत्रांनी सांगितले. भाजपमधील सुत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवडाभरात पक्ष प्रवेश होणार आहेत. अनेक जण भाजपमध्ये येणार असल्याने टप्प्याटप्याने हे प्रवेश होणार आहेत. दहशतवाद ड्रग्ज आदी मुद्यांवरून पंजाबमध्ये रोष आहे. त्यामुळे लोक आता भाजपकडे आशेने पाहत आहेत.

अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. शेतकरी आंदोलनामुळे भाजपविरोधात राज्यात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. पण आता कायदे मागे घेण्यात आल्याने तसेच अमरिंदरसिंग भाजपसोबत गेल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसमध्ये नवज्योतसिंग सिध्दू यांच्याविषयी काही गट नाराज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आगामी निवडणूक काँग्रेससाठी कठीण असल्याचे संकेत मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com