काँग्रेसला मोठा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या भावाची बंडखोरी; अपक्ष म्हणून देणार टक्कर

मुख्यमंत्र्यांचा भाऊच आता पंजाबमध्ये काँग्रेसच्या विरोधात रिंगणात उतरला आहे.
Manohar Singh
Manohar SinghSarkarnama

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसने (Congress) 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात काँग्रेसने मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या भावालाच उमेदवारी नाकारली आहे. यामुळे चन्नी यांच्या भावाने बंडखोरी केली असून, ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत.

काँग्रेसने या यादीत मुख्यमंत्री चन्नी यांना मोठा धक्का दिला. चन्नी हे त्यांचे बंधू मनोहरसिंग यांच्यासाठी बस्सी पठाणा मतदारसंघातून आग्रही होते. यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मनोहरसिंग यांना काँग्रेसने तिकिट वाटपात डावलले आहे. या मतदारसंघात काँग्रेसने विद्यमान आमदार गुरप्रितसिंग यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे मनोहरसिंग यांना बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भावानेच बंडखोरी केल्याने काँग्रेसवर नामुष्की ओढवली आहे. काँग्रेसने एक कुटुंब एक तिकिट हा नियम लावला आहे. त्यामुळे मनोहरसिंग यांना उमेदवारी देण्यात आली नाही. आता मनोहरसिंग यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. चन्नी यांचा बालेकिल्ला असलेल्या बस्सी पठाणामधून ते आता काँग्रेसलाच आव्हान देणार आहेत. याबाबत त्यांनी जाहीर घोषणाही केली आहे. काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला असून, विद्यमान आमदार निष्क्रिय आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Manohar Singh
विधानसभा निवडणुका पुढे ढकलणार? मुख्यमंत्र्यांचे निवडणूक आयोगाला पत्र

काँग्रेसने जाहीर केलेल्या 86 उमेदवारांच्या पहिल्या यादीनुसार, मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी हे राखीवन चमकौर साहिब मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत. यादीत प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (अमृतसर पूर्व), खासदार प्रतापसिंग बाजवा (काडियन), उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा (डेरा बाबा नानक), उपमुख्यमंत्री ओ.पी.सोनी (अमृतसर मध्य) आणि परगतसिंग (जालंधर कॅन्टोन्मेंट) या बड्या नेत्यांचा समावेश आहे.

Manohar Singh
सोनू सोदच्या बहिणीला तिकिट मिळताच काँग्रेस आमदार थेट भाजपमध्ये दाखल

राज्यात 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते. काँग्रेसने 117 पैकी 77 जागा मिळवत अकाली दल व भाजप आघाडीच्या ताब्यात सत्ता काबीज केली होती. हे दोन्ही पक्ष सलग 10 वर्षे राज्यात सत्तेत होते. या निवडणुकीत आप 20 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता, तर अकाली दलाला 15 आणि भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com