भगवंत मान यांना मोठा झटका; लोकसभेच्या पोटनिवडणुकीत गडाला सुरूंग

भगवंत मान यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक झाली.
CM Bhagwant Mann Latest Marathi News, Bypoll Result Latest News
CM Bhagwant Mann Latest Marathi News, Bypoll Result Latest NewsSarkarnama

चंदीगड : काही महिन्यांपूर्वीच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून पंजाबमध्ये सत्ता काबीज केलेल्या आम आदमी पक्षाला (AAP) राज्यात पहिला मोठा धक्का बसला आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याच पूर्वीच्या मतदारसंघात हा पराभव पत्करावा लागल्याने मान यांच्यावर नामुष्की ओढवली आहे. (Punjab Loksabha Bypoll Result Update)

भगवंत मान (Bhagwant Mann) हे विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला होता. त्यामुळे संगरूर मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत शिलोमणी अकाली दल (अमृतसर) पक्षाचे अध्यक्ष सिमरनजित सिंग मान या 77 वर्षीय नेत्यानं आपच्या उमेदवाराला धूळ चारली आहे. आपणे गुलमेल सिंग यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा 5 हजार 800 मतांनी पराभव झाला आहे.

CM Bhagwant Mann Latest Marathi News, Bypoll Result Latest News
पहिल्याच निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा दणदणीत विजय; भाजपला चारपैकी तीन जागा

सिमरनजित सिंग यांच्या पक्षाचा आणि शिरोमणी अकाली दलाचा काहीही संबंध नाही. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार दरवील सिंग गोल्डी, भाजचे केवळ ढिल्लन आणि अकाली दलाचे कमलदीप कौर राजौना यांना अनुक्रमे तिसरा, चौथा व पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

ही पोटनिवडणुकीत मान यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. पंजाबमध्ये आपची सत्ता आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. संगरूर मतदारसंघ हा आपचा गड मानलो जातो. या मतदारसंघातील सर्व नऊ विधानसभा मतदारसंघात आपचे उमेदवार निवडून आले आहेत.

भगवंत मान हे 2014 च्या मोदी लाटेत या मतदारसंघातून निवडून येत लोकसभेत पोहचले होते. त्यांनी विरोधी उमेदवाराचा तब्बल 2 लाख 11 हजार मतांनी पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल 1 लाख 10 हजार मतांनी पराभव केला होता. पण आता मान हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या गडातच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने धक्का मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com