ठोको ताली! सिद्धू पराभवाच्या उंबरठ्यावर; स्वतःसह काँग्रेसलाही घेवून बुडाले

Punjab Assembly Election | BJP | AAP | Congress | 5 States Election update : काँग्रेसचा दारुण पराभव
Navjyot Singh Sidhu, Charanjit Singh Channi, Sonia Gandhi
Navjyot Singh Sidhu, Charanjit Singh Channi, Sonia Gandhisarkarnama

अमृतसर : आम आदमी पक्षाने (Aam Aadami Party) पंजाबमध्ये (Punjab Assembly Election Result) मोठे उलटफेर केले आहेत. आम आदमी पक्षाला पूर्ण बहुमत आकड्यासह तब्बल ८९ जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला केवळ १८ जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपला अवघ्या ३ जागांवर आघाडी घेता आली आहे. भाजपचा जुना साथीदार आणि एकेकाळचा सत्ताधारी असलेला शिरोमणी अकाली दल फक्त ०६ जागांवर यशस्वी होताना दिसत आहे. (Arvind Kejriwal News updates)

यात काँग्रेससाठी अजून एक मानहानीकारक गोष्ट म्हणजे काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे दोन्ही मतदार संघातून पिछाडीवर आहेत. चमकौर साहिबमधून चन्नी यांना २३ हजार ५४७ मत आहेत. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार चरणजीत सिंग हे २४ हजार ७९१ मतांसह आघाडीवर आहेत. तर दुसऱ्या भदौर मतदारसंघातून चन्नी यांना ७ हजार ८९५ मत मिळाली आहेत. इथे त्यांच्या विरोधातील आम आदमी पक्षाचे उमेदवार लाभ सिंह यांना १४ हजार २२९ मत मिळाली आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून चन्नी जवळपास पराभवाच्या छायेत आहेत. (Punjab election results 2022 live updates)

याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे देखील पराभवाच्या छायेत आहेत. अमृतसर पू्र्वमधून सिद्धू यांना १२ हजार ९१४ मत मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधातील आम आदमी पक्षाचे उमेदवार जीवन ज्योत कौर यांना १५ हजार ८७६ मत मिळाली आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांची ४३ हजार ८९८ मतांसह विजयाकडे वाटचाल सुरु आहे. तर त्यांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवार दलविरसिंग गोल्डी यांना १४ हजार १९१ मत मिळाली आहेत. त्यामुळे आता पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येणार असून भगवंत मान हे मुख्यमंत्री होणार हे जवळपास अंतिम झाले आहे.

पंजाबमधील काँग्रेसचे कार्यकर्तेय या पराभवासाठी केवळ आणि केवळ सिद्धू यांनाच जबाबदार धरत आहेत. सिद्धू यांनी पक्षात तयार केलेली अंतर्गत बंडाळी, अतिमहत्वकांक्षीपणा, सगळी सूत्र आपल्याच हाती असावी हे धोरण आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांना अपमास्पद वागणूक देवून हाकलून देणे या सिद्धू यांनी केलेल्या गोष्टी आज काँग्रेसला अंगलट आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे कार्यकर्ते देताना दिसत आहेत. त्यामुळे आता सिद्धू हे स्वतःसह काँग्रेसला देखील घेवून बुडाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in