अखेर खातेवाटप झालं..मुख्यमंत्र्यांकडे तब्बल 13 खाती अन् गृहमंत्री भाजपचा! - puducherry chief minister n rangaswamy will hold 13 portfolios | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

अखेर खातेवाटप झालं..मुख्यमंत्र्यांकडे तब्बल 13 खाती अन् गृहमंत्री भाजपचा!

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जुलै 2021

खातेटवाटपावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. मुख्यमंत्र्यांकडे तब्बल 13 खात्यांचा कार्यभार देण्यात आला असून, भाजपला गृहमंत्रिपद देण्यात आले आहे.  

पुदुच्चेरी : केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये (Puducherry) एनआर काँग्रेस (NR Congress) आणि भाजप (BJP) यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच झाला. मुख्यमंत्री एन.रंगास्वामी यांच्या एनआर काँग्रेसला तीन तर भाजपला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. खातेटवाटपावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे.

खातेटवाटपावरुन एनआर काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला होता. मंत्रिमंडळाची संख्या लहान असल्याने एका-एका मंत्र्याकडे अनेक खात्यांच्या कार्यभार आला आहे. महत्वाची खाती आपल्याकडे यावीत, यासाठी मंत्र्यांनी लॉबींग केले होते. याचबरोबर गृह आणि अर्थ खात्यावरुन दोन्ही पक्षांमध्ये मतभेद होते. मुख्यमंत्री रंगास्वामी यांच्याकडे तब्बल 13 खात्यांचा कार्यभार देण्यात आला असून, भाजपला गृहमंत्रिपद देण्यात आले आहे.  

मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांकडे प्रत्येकी 6 खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या नमशिवाय यांना महत्वाच्या गृह खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर त्यांच्याकडे ऊर्जा, उद्योग, वाणिज्य, शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण आणि सैनिक कल्याण विभाग त्यांच्याकडे देण्यात आले आहेत. भाजपच्या साई सर्वानन कुमार यांच्याकडे नागरी पुरवठा व ग्राहक कामकाज, जिल्हा ग्रामीण विकास संस्था, समुदाय विकास, नागरी मूलभूत सेवा, अग्निशमन आणि अल्पसंख्याक विभागांचा कार्यभार देण्यात आला आहे. 

एनआर काँग्रेसचे के.लक्ष्मीनारायणन यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, हवाई वाहतूक, मत्सोद्योग, कायदा, माहिती तंत्रज्ञान आणि छपाई विभाग आहेत. सी. देजाकुमार यांच्याकडे कृषी, पशुसंवर्धन, वन, समाज कल्याण, मागासवर्गीय कल्याण, महिला व बाल कल्याण विभाग आहेत. चंडिरा प्रियांगा यांच्याकडे गृहनिर्माण, कामगार, कला व संस्कृती, सांख्यिकी यासह इतर मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे.  

एनआर काँग्रेस आणि भाजप आघाडीला एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत विजय मिळाला होता. त्यानंतर 7 मे रोजी रंगास्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून मंत्रिमंडळाबाबत उत्सुकता होती. एनआर काँग्रेस आणि भाजपमध्ये मंत्रिपदांवरुन रस्सीखेच सुरू होती. अखेर एनआर काँग्रेसला 3 आणि भाजपला 2 मंत्रिपदे मिळाली आहे. एनआर काँग्रेसचे के.लक्ष्मीनारायण, सी.देजाकुमार आणि चंदिरा प्रियांगा यांचा मंत्र्यांमध्ये समावेश आहे. भाजपचे नमशिवायम आणि साई जे. सर्वानन यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्यांचा शपथविधी राजभवनात झाला. चंदिरा प्रियांगा या मागील 41 वर्षांतील पुदुच्चेरीमधील पहिल्या महिला मंत्री ठरल्या आहेत. 

हेही वाचा : पंजाबबाबत लवकरच मोठा निर्णय...सिद्धू अन् प्रियांका गांधींची गोपनीय भेट? 

भाजपने उपमुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरल्याने नवीन मंत्रिमंडळाची स्थापना रखडली होती. अखेर भाजपला विधानसभा अध्यक्षपद देण्यात आले. भाजपने विधानसभा अध्यक्षपदी आर.सेल्वम यांची निवड केली. यामुळे मुख्यमत्र्यांच्या शपथविधीनंतर अखेर 50 दिवसांनी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. मुख्यमंत्री रंगास्वामी यांच्या मंत्रिमंडळात एकूण सहा मंत्री असून, यात एनआर काँग्रेसचे तीन आणि भाजपचे दोन मंत्री आहेत.     

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख