Gujrat Election : गुजरात निवडणुकांच्या घोषणेची शक्यता ; 'या' तारखेला होणार जाहीर!

Gujrat Election : निवडणूक आयोगावरील केंद्र सरकारच्या वर्चस्वाबाबत विविध आरोप सुरू आहेत.
Gujrat Election
Gujrat Election Sarkarnama

दिल्ली : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या (Gujrat Election) तारखा जाहीर न केल्याने विरोधकांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. हिमाचल प्रदेशच्या तारखा जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगावरील केंद्र सरकारच्या वर्चस्वाबाबत विविध आरोप सुरू आहेत. मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाने या तारखा जाहीर करण्यासाठीची पूर्वतयारी पूर्ण केली आहे.

आयोगाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, गुजरात विधानसभा निवडणुकींच्या तारखा पुढील दोन ते तीन दिवसांत म्हणजे २ नोव्हेंबरपर्यंत कधीही जाहीर होऊ शकतो. गुजरातमधील निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होऊ शकते. ८ डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशाच्या बरोबरीने गुजरातमध्येही मतमोजणी होण्याची शक्यता आहे.

Gujrat Election
POK ताब्यात घेणारच, गिलगिट-बाल्टिस्तानशिवाय काश्मीर अपूर्ण : राजनाथ सिंह कडाडले!

आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा १४ ऑक्टोबर रोजी जाहीर केल्या आहेत. हिमाचलमध्ये एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशात आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. हिमाचलच्या बरोबरीने निवडणूक आयोगाने गुजरातच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Gujrat Election
गुजरात निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती; तिकीट वाटपात शहांची मोठी घोषणा

गुजरातच्या प्रस्तावित निवडणुकीतील पहिला टप्पा ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर आणि दुसरा टप्पा ४ डिसेंबरच्या आसपास असू शकतो. गुजरात निवडणुकीबाबत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने तिघेही आपापली रणनीती बनवत आहेत. आम आदमी पक्षाने निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची आपली सातवी उमेदवारी यादी जाहीर केली आहे.

भाजपचे अनेक बडे नेतेही गुजरात दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी रणनीती ठरवण्यासाठी गुजरातच्या सौराष्ट्रातील पक्षनेत्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही गुजरातमधील झंझावात सुरू झाला आहे. आप व कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी मोदी यांच्या मातोश्रींवरही अभद्र टीका केल्याने भाजपने तो भावनिक मुद्दा बनविला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in