भावासाठी जीवही देईन आणि तो...! प्रियांका गांधींचं मोठं वक्तव्य

बहीण-भावामध्ये मतभेद असल्याचं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं.
Priyanka Gandhi and Rahul Gandhi
Priyanka Gandhi and Rahul GandhiSarkarnama

अमृतसर : काँग्रेसच्या (Congress) सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Ganhi) यांनी रविवारी पंजाबमधील (Punjab) जाहीर सभेत मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) व प्रियांका गांधी यांच्यामध्ये वाद असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केलं होतं. त्याला प्रियांका यांनी पंजाबमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

पक्षात वाद असल्याच्या मुद्यावर बोलताना बोलताना प्रियांका म्हणाल्या, मी भावासाठी (राहुल गांधी) जीवही देऊ शकते आणि तोही माझ्यासाठी जीव देईल. काँग्रेसमध्ये हितांसाठी कसलेही मतभेद नाहीत. पण भाजपमध्ये याउलट स्थिती आहे. भाजपमध्ये वाद आहेत, काँग्रेसमध्ये नव्हे. योगीजी, मोदीजी आणि अमित शहा यांच्यात मतभेद असू शकतात, अस पलटवार प्रियांका यांनी केला. (Punjab Election 2022)

Priyanka Gandhi and Rahul Gandhi
भर सभेत प्रियांका गांधींसमोरच रुसले सिध्दू अन् चर्चेला आलं उधाण!

प्रचार सभेत प्रियांका यांनी चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसला बहुमत देण्याचं आवाहन मतदारांना केलं. यावेळी त्यांनी आपवरही जोरदार प्रहार केला. इथे आलेल्या एका पक्षाने दिल्ली मॉडेल दाखवलं आहे. याआधीही देशात गुजरात मॉडेल आलं होतं. पण ते नापास झाले. गुजरात मॉडेल केवळ जाहिरातींमध्येच आहे. दिल्लीची स्थितीही वेगळी नाही. दिल्लीत आपने काहीच केलं नाही. (Punjab Election Update)

पंजाबमध्ये अमरिंदरसिंग हे दिल्लीच्या इशाऱ्यावर चालत होते. त्यामुळे पक्षाने त्यांना बदललं. आता पंजाब सरकार चालवण्यासाठी पक्षाने गरिब कुटुंबातील चन्नी यांना प्रमुख म्हणून निवडलं आहे. पंजाबची सरकार पंजाबमधूनच चालायला हवी, असं आम्हाला वाटतं. आम आदमी पक्षाचं सरकार आलं तर ते दिल्लीतून चालेल, असे प्रियांका यांनी भाषणादरम्यान सांगितले.

सिध्दूंची नाराजी पुन्हा चव्हाट्यावर

प्रचार सभेदरम्यान प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांची नाराजी पुन्हा दिसून आली. मुख्यमंत्रिपदासाठी चरणजितसिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा केल्यापासून ते नाराज आहे. रविवारी प्रियांका गांधी यांच्या सभेतही सिध्दू यावरून नाराज असल्याचे स्पष्ट झाले. प्रियांका गांधी यांच्या सभेत सिध्दू व्यासपीठावर उपस्थित राहिले, पण त्यांनी चक्क भाषण करण्यास नकार दिला. आपल्या या कृतीतून त्यांनी प्रियांका गांधी यांच्यासमोरच नाराजी व्यक्त केली. त्यामुळे काँग्रेसमध्ये याचीच चर्चा रंगली आहे. सिध्दू यांनी मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणीही त्यांचीच होती.

पंजाबसाठी त्यांनी आपला अजेंडाही मांडला आहे. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांचा पत्ता कट केला. तेव्हापासून ते उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत आहेत. सिध्दू यांना प्रियांका गांधी यांचे कट्टर समर्थक मानले जाते. माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्याविरोधानंतरही प्रियांका यांच्या सांगण्यावरून सिध्दूंना पक्षात एन्ट्री देण्यात आली होती. त्यामुळे सिध्दू यांनी रविवारी त्यांच्यासमोरच आपली नाराजी व्यक्त केल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com