Priyanka Gandhi : आमच्या शरीरात शहिदांचे रक्त; प्रियांका गांधी आक्रमक : हे मोठं षडयंत्र...

Congress News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्दा झाल्यामुळे देशभरातील राजकीय वातवरण तापले आहे.
Priyanka Gandhi, Rahul Gandhi News
Priyanka Gandhi, Rahul Gandhi NewsSarkarnama

Priyanka Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्दा झाल्यामुळे देशभरातील राजकीय वातवरण तापले आहे. काँग्रेसकडून देशभरात निर्देशने करण्यात येत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही या निर्णयावरून मोदी सरकावर जोरदार टीका केली.

प्रियांका गांधी म्हणाल्या, भाजपचे (BJP) प्रवक्ते, नेते आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझा भाऊ, माझे आई-बाबा आणि पंडित नेहरुंवर खालच्या पातळीवर टीका करत असतात. मात्र, त्यांना आजपर्यंत कोणतीही शिक्षा झाली नाही. राहुल गांधी यांनी संसदेत गौतम अडाणींचा मुद्दा उपस्थित केला. सरकारला प्रश्न विचारले, म्हणून मानहानीच्या निमित्ताने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा, आरोप प्रियांका गांधी यांनी केला.

Priyanka Gandhi, Rahul Gandhi News
Assembly Session : राहुल गांधींच्या मुद्यावर विरोधक आक्रमक : विधानसभा अध्यक्ष कारवाईचा निर्णय घेत नसल्याने सभात्याग

एका वर्षापासून या प्रकरणाला स्थगिती दिलेली होती. याचिकाकर्त्यानेच हे प्रकरण स्थगित करण्याची मागणी केली होती. मात्र, संसदेत राहुल गांधी यांनी गौतम अदाणींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला प्रश्न विचारले. त्यानंतर याचिकाकर्त्याने अचानक हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले. मुळात मोदी सरकारला गौतम अडाणींच्या मुद्यावर उत्तर द्यायचेच नाही. त्यामुळे षडयंत्र रचून त्यांनी राहुल यांना संसदेच्या बाहेर काढले आहे, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या.

Priyanka Gandhi, Rahul Gandhi News
Rahul Gandhi : राहुल गांधींवरील कारवाईची अमेरिकेतही दखल; भारतीय वंशांचे खासदार, पंतप्रधान मोदींना म्हणाले...

राहुल गांधी आणि काँग्रेस या विरोधात जोरदार लढा येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्या शरीरात शहिदांचे रक्त आहे. ते नेहमी आम्हाला परिवारवादी म्हणतात. मात्र, आमच्या परिवाराने या देशासाठी बलिदान दिले. आम्ही माघार घेणार नाही, आम्ही मोदी सरकारला घाबरणार नाही, असा इशारा प्रियांका गांधी यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com