कोरोना नियंत्रणाबाहेर; राजधानीत खासगी कार्यालये, रेस्टॉरन्ट, बार आजपासून कुलूपबंद

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
Lockdown in Delhi
Lockdown in DelhiSarkarnama

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे मागील आठवड्यातच शाळा, महाविद्यालये, सलून, चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बस, मेट्रो सुरू असली तरी प्रवाशांवर निर्बंध घालण्यातआले आहेत. पण त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नसल्याने आता दिल्लीतील सर्व खासगी कार्यालये, रेस्टॉरन्ट व बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाची (covid19) वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन राजधानी दिल्लीत काही दिवसांपूर्वीच शनिवारी व रविवारी संचारबंदी जाहीर कऱण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांनाही घरून काम करणयाच्या सुचना देण्यात आल्या होत्या. पण आता ही कार्यालये पूर्णपणे बंद राहतील.

Lockdown in Delhi
कोरोना चाचणी कुणाची करावी, कुणी करू नये? केंद्र सरकारचा मोठा निर्णय

दिल्ली आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने याबाबतचा आदेश काढला आहे. त्यानुसार, दिल्लीतील सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. सर्वांना घरून काम करण्याचे (Work From Home) आदेश देण्यात आले आहेत. मात्र, यातून अत्यावश्यक सेवा तसेच काही महत्वाच्या कार्यालयांना वगळण्यात आले आहे. दिल्लीतील बार व रेस्टॉरन्टही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेस्टॉरन्समधून केवळ पार्सलच्या सुविधेला परवानगी देण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. मागील आठ ते दहा दिवसांत दिल्लीतील कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढत चालला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही कोरोनाबाधित होते. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी आता संपला असून ते थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत आणखी काही मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Lockdown in Delhi
कोरोनाबाधित रुग्णांसाठी केंद्र सरकारची नवी नियमावली; जाणून घ्या सविस्तर

असे आहेत दिल्लीतील निर्बंध...

- रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी

- सम-विषम नियमानुसार दुकाने, मॉल (अत्यावश्यक सेवा वगळून) सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत खुली राहतील.

- उद्योगधंदे सुरू राहणार

- बांधकाम क्षेत्राला दिलासा, कामे सुरू ठेवण्यास परवानगी

- रेस्टॉरन्स व बार पूर्णपणे बंद.

- चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, सभागृह अनिश्चित काळासाठी बंद राहणार

- हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी, पण कार्यक्रमाचे हॉल बंद राहणार

- स्पा, जिम, सलून, ब्युटी पार्लर, योगा इन्स्टिट्यूट, मनोरंजन पार्क बंद राहणार

- दिल्ली मेट्रो, बस 100 टक्के क्षमतेने धावणार

- रिक्षा, ई-रिक्षा, टॅक्सी, सायकल रिक्षामध्ये केवळ दोन प्रवाशांना परवानगी

- स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्टेडियम, जलतरण तलाव बंद राहणार

- सार्वजनिक उद्याने सुरू राहणार

- विवाह समारंभांना केवळ 20 लोकांना उपस्थितीची परवानगी

- सामाजिक, राजकीय, धार्मिक, उत्सव आणि इतर मनोरंजनात्मक उपक्रमांवर बंदी

- धार्मिक ठिकाणे खुली राहणार पण भक्तांना प्रवेशासाठी बंधने

- शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास बंद राहणार

- खासगी कार्यालये बंद. वर्क फ्रॉम होमचे आदेश.

- अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सुचना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com