Prithviraj Chavan: कर्नाटकात आमचचं सरकार येणार ; 113 पेक्षा जास्त जागा मिळणार पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास

Karanataka Election : कर्नाटक निवडणूक देशाला दिशा देणारी ठरेल
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan Sarkarnama

Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभेची निवडणूक केवळ कर्नाटकाच्यादृष्टीने महत्त्वाची नसून, संपूर्ण देशाच्यादृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत सत्तांतर अटळ असून, काँग्रेसला 113 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

Prithviraj Chavan
Karnataka Election : निवडणूक आयोगाची काँग्रेस पक्षाला नोटीस; काय आहे कारण ?

या निवडणुकीनंतर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे ही निवडणूक सत्तांतरासाठी देशाला दिशा देणारी ठरणार आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती मिळेल असे वाटत होते. मात्र, तसे होतांना दिसत नाही.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी स्वतः पंतप्रधान ताकदीने निवडणूक प्राचारात उतरले आहेत. कर्नाटकात पुर आला त्यावेळी पंतप्रधान कधीही पूर ग्रस्तांची चौकशी करायला आले नाहीत. आता मात्र, "बजरंग बलीच नाव घेऊन मतदान करा असं सांगत आहेत. याचाच अर्थ त्यांना निवडणुकीच्या निकाला बाबत त्यांना चिंता आहे. त्यामुळेच भाजपचे अनेक नेते कर्नाटकला प्रचारासाठी जात आहेत. कर्नाटकात काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता येईल, 113 पेक्षा अधिक जागांवर पक्षाला विजय प्राप्त होईल", असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

Prithviraj Chavan
Karnataka Election: गांधींविरोधातील तक्रारीनंतर अन् मतदानाला काही तास उरले असतानाच भाजपचं मध्यरात्री 'ते' ट्विट...

भाजप विरोधात महाविकास आघाडी मजबूत होणं गरजेच.

भाजप विरोधातील आघाडी मजबूत होणे गरजेच आहे. महाविकास आघाडी हीच मुळात भाजपला रोखण्यासाठी एकत्र आली होती. त्यामुळे त्यांचा विषारी प्रसार होऊ नये, महाविकास आघाडीला धक्का लागेल असं कुणी वागू नये, असंही चव्हाण म्हणाले.

सत्तासंघर्षाची सुनावणी

दरम्यान, सत्तासंघर्षाच्या बाबतीत चव्हाण म्हणाले, पॉलिटिकल निर्णय आहे. असा अंदाज आहे आणि सगळ्यांना वाटतंय, की या आठवड्याभरात सुप्रिम कोर्टाचा निर्णय येऊ शकतो. जरी शिंदे आणि त्यांचे इतर १५ सहकारी अपात्र ठरले तरी भाजपकडे बहुमत असेल. त्यामुळे निर्णय आल्यानंतरच कळेल की महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला जाणार आहे.

Edited by : Rashmi Mane

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com