Prince Charles आता चार्ल्स तिसरे म्हणून ओळखले जाणार ; 70 वर्षांनंतर राष्ट्रगीत बदलणार

Charles III : 18 व्या शतकातील परंपरेनुसार, राजे चर्च ऑफ स्कॉटलंडचे रक्षण करण्याची शपथ घेतील.
Prince Charles
Prince Charlessarkarnama

नवी दिल्ली : इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या (queen elizabeth) यांचे गुरुवारी निधन झाले. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनानंतर त्यांचा थोरला मुलगा प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) नवे राजे झाले आहेत. ते आता राजे चार्ल्स तिसरे (Charles III) म्हणून ओळखले जाणार आहेत. त्याची पत्नी कॅथरीन डचेस ऑफ कॉर्नवॉल म्हणून ओळखली जाईल. (Charles III latest news)

साधारण एका दिवसानंतर असोसिएशन कौन्सिलमध्ये बैठक होणार आहे. यामध्ये राजाचाही समावेश असतो. यावेळी कोणताही शाही शपथविधी सोहळा होणार नाही.

18 व्या शतकातील परंपरेनुसार, राजे चर्च ऑफ स्कॉटलंडचे रक्षण करण्याची शपथ घेतील. यानंतर सेंट जेम्स पॅलेसच्या बाल्कनीतून जाहीर घोषणा केली जाईल. एक अधिकारी ज्याला गार्टर किंग ऑफ आर्म्स नावाने ओळखले जाते, प्रिन्स चार्ल्स तिसरे ब्रिटनचे नवीन राजे असल्याची घोषणा करेल. यानंतर ब्रिटनचे राष्ट्रगीत गायले जाईल.

Prince Charles
Queen Elizabeth : महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांचे निधन : राजेपदी थोरले चिरंजीव चार्ल्स

1952 नंतर प्रथमच ब्रिटीश राष्ट्रगीतामध्ये 'गॉड सेव्ह द किंग' हा शब्द असेल. त्याआधी गॉड सेव्ह द क्वीन असा शब्द होता. यानंतर हायड पार्क, टॉवर ऑफ लंडन आणि नौदलाच्या जहाजांकडून तोफांची सलामी दिली जाईल.

2.23 किलोचा सोन्याचा मुकुट

वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे गेल्या 900 वर्षांपासून राज्याभिषेक सोहळा होतो. चार्ल्स हे 40 वे सम्राट असतील. या वेळी कँटरबरीचे मुख्य बिशप सेंट एडवर्ड्स शाही मुकुट चार्ल्सच्या डोक्यावर ठेवतील. जो सोन्याचा मुकुट आहे. याचे वजन सुमारे 2.23 किलो आहे. हा मुकुट टॉवर ऑफ लंडनमधील क्राउन ज्वेल्सच्या केंद्रस्थानी आहे. तो राज्याभिषेकाच्या वेळीच राजाला घातला जातो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in