मोदींचा खासदारांना निर्वाणीचा इशारा; बदला अन्यथा तुम्हाला बदलेन!

मुलांनाही एखादी गोष्ट अनेकदा सांगितली तर आवडत नाही.
PM Narendra Modi
PM Narendra Modisarkarnama

नवी दिल्ली : संसद अधिवेशन चालू असताना गायब राहणाऱ्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी इशारा दिला आहे. अधिवेशनात (Winter Session) गायब राहण्याची सवय बदला नाहीतर तुम्हालाच बदलावे लागेल, असे पंतप्रधानांनी खासदारांना सुनावले. संसदेवर निवडून येणाऱ्या खासदारांनाही बालिशपणा न करण्याचा सल्ला देण्याची वेळ पंतप्रधानांवर आल्याचे दिसले.

भाजपच्या साप्ताहिक संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना पंतप्रधानांनी माध्यमांशी विनाकारण बोलू नका, असाही सल्ला खासदारांना दिला. मोदी सरकारने बिरसा मुंडा यांची जयंती (15 नोव्हेंबर) आदिवासी समाज दिन म्हणून साजरा करण्याचा जो निर्मय घेतला. त्याबद्दलही या वेळी पंतप्रधानांचा सन्मान करण्यात आला.

PM Narendra Modi
केंद्राच्या डेटामध्ये चुका आहेत हे फडणवीसांनी दहा वेळा सांगितलेय

लोकसभाच नव्हे तर मोदी सरकारचे अल्पमत असलेल्या राज्यसभेत सत्तारूढ बाकांवरील उपस्थिती रोडावल्याचे चित्र महत्वाची विधेयके मंजूर होतांनाही अलीकडे पुन्हा दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी स्वपक्षीय खासदारांना संसदीय उपस्थितीबाबतचा इशारा दिला. या वेळी गृहमंत्री अमित शहा, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, विदेशमंत्री एस जयशंकर, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्तार अब्बास नक्वी, व्ही मुरलीधरन, कायदा मंत्री किरेन रिज्जू आदी उपस्थित होते.

शिस्तीत रहा असे सांगताना मोदी म्हणाले की संसदेत वेळेवर येत जा. बैठकांमध्ये आणि चर्चांमध्ये भाग घेत चला. आपले नाव पुकारल्यावरच बोला. संसदीय उपस्थितीबाबतच्या स्पर्धेत भाग घ्या. लहान मुलांसारखे वर्तन संसदेत करू नका, असे पंतप्रधान कडाडले. तुमचे बेशिस्त वर्तन मला त्रासदायक ठरेल. मी तुमच्याशी लहान मुलांशी वागतात तशा शिस्तीने वागेन हे माझ्यासाठीही चांगले नाही. मुलांनाही एखादी गोष्ट अनेकदा सांगितली तर आवडत नाही, असेही मोदी म्हणाले.

PM Narendra Modi
फडणवीस म्हणाले; पुण्यात भाजपाचेच अस्तित्व जाणवते

नियमित सूर्यनमस्कार करण्याचाही सल्ला मोदींनी खासदारांना बैठकीत दिला. या पूर्वी आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरही मोदींनी नव्या मंत्र्यांना पत्रकारांशी विनाकारण न बोलण्याबाबत कडक समज दिली होती. सकाळी 9.30 च्या ठोक्याला मंत्रालयांत हजर राहिलेच पाहिजे. तुमचे काम चमकले पाहिजे, चेहरा नव्हे अशी तंबी मोदींनी नव्या मंत्र्यांना दिली. संसदेत अधिवेशन काळात हजर राहण्याबाबत मोदींनी 2014 पासून अनेकदा भाजप खासदारांना समज दिली आहे. हा शब्दांचा मार मोदींना किती वेळा द्यावा लागणार, असा सवाल शिस्तप्रिय भाजप खासदारांत चर्चेचा विषय ठरला होता.

बैठकीत पंतप्रधानांनी कोरोना महामारी व नव्या अॅमिक्रॅान व्हेरियंटबाबतही चर्चा केली. रूग्णसंख्या कमी होत आहे. त्याबरोबरच लोकांमध्ये निषकाळजीपण वाढत आहे. याबद्दल चिंता व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले की पर्यटन स्थळे व बाजारपेठांत पुन्हा गर्दी उसळत आहे हा चिंताजनक विषय आहे. कोरोना आरोग्य नियम सक्तीने पाळण्याबद्दल खासदारांनी लोकांमध्ये जागृती करावी. कोरोना महामारीचा धोका अद्याप टळलेला नाही व याचे नवनवीन म्यूटेंट सातत्याने समोर येत आहेत, असेही मोदी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com