Heeraben Modi passed away : पंतप्रधान मोदींच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं निधन

Pm Narendra Modi : शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
pm narendra modi, heeraben modi
pm narendra modi, heeraben modisarkarnama

Pm Narendra Modi Mother Heeraben Modi Death: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं आहे. शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. पंतप्रधान मोदी यांनी देखील आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी थेट अहमदाबाद गाठले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.

हिराबेन मोदी यांचं पार्थिव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्या घरी ठेवण्यात आलं आहे. पंकज मोदी यांचं घर गांधीनगरच्या रायसणमधील वृंदावन सोसायटीमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्यावर गांधीनगरमधील सेक्टर 30 मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची श्रद्धांजली...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीच्या निधनाचं वृत्त अतिशय दु:खद आहे. आई ही आपल्या आयुष्यातील पहिली गुरु असते जिला गमावल्याचं दुःख हे सर्वात मोठं असतं. 

नरेंद्र मोदीं (Narendra Modi) च्या आईच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी,प्रियंका गांधी यांच्यासह देश विदेशातील अनेक नेत्यांनी प्रार्थना केली होती. याचवेळी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन मोदी यांच्या उत्तम स्वास्थासाठी प्रार्थना केली होती.

pm narendra modi, heeraben modi
Sharad Pawar : शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले,''तुमच्या आयुष्यातील या कठीण प्रसंगाची..!''

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून होते. त्यात त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. याच पत्रात त्यांनी हीराबेन मोदी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली होती.

पवार पत्रात लिहितात, तुमच्या मातोश्री अहमदाबादच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तुम्ही त्यांना काल भेटण्यासाठी गेला होतात. तुमच्या आईची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं ऐकून बरं वाटलं. तुमचं तुमच्या आईवर किती प्रेम आहे आणि तुम्ही आईच्या किती जवळ आहात हे मला माहीत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील या कठीण प्रसंगाची मला जाणीव आहे.

pm narendra modi, heeraben modi
Ajit Pawar : नार्वेकरांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर अजित पवारांची सहीच नाही? 'मविआ'त खळबळ!

तसेच आई हा पृथ्वीवरील सर्वात शुद्ध आत्मा आहे. तुमच्या जीवनाला आकार देण्यासाठी तुमची आई ऊर्जा आणि निरंतर शक्तीचं स्त्रोत राहिल्या आहेत. त्यांना लवकरात लवकर बरे वाटावे आणि त्यांची प्रकृती ठणठणीत व्हावी म्हणून मी प्रार्थना करतो. तसेच मोदी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही पवार यांनी दिल्या होत्या.

राहुल गांधींचं ट्विट...

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की "आई आणि मुलामधील प्रेम हे शाश्वत आणि अमूल्य आहे. मोदीजी, या कठीण काळात माझे प्रेम आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे. मला आशा आहे की तुमची आई लवकर बरी होईल." तसेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही रुग्णालयात दाखल असलेल्या हीराबेन या लवकरात लवकर त्यांची प्रकृती सुधारावी, असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in