prime minister narendra modi wishes for speedy recovery of rahul gandhi
prime minister narendra modi wishes for speedy recovery of rahul gandhi

राहुल गांधी कोरोना पॉझिटिव्ह अन् तासाभरातच पंतप्रधान मोदींची प्रार्थना

काँग्रेस नेते राहुल गांधी हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना सौम्य लक्षणे असून, त्यांनीच ट्विटरवरुन याची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, राहुल गांधींनी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे ट्विट करताच त्यांच्या आरोग्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रार्थना केली आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मला काही सौम्य लक्षणे जाणवत होती. त्यानंतर मी चाचणी केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाविषयक उपाययोजनांचे पालन करावे आणि सुरक्षित राहावे. 

राहुल यांनी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे ट्विट केल्यानंतर तासाभरातच पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करीत राहुल यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. लोकसभेचे खासदार राहुल गांधींच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो, असे मोदींनी म्हटले आहे. मोदींनी राहुल यांचा उल्लेख लोकसभेचे खासदार केला असला तरी काँग्रेस पक्षाचा उल्लेख करणे मात्र, टाळले आहे.  राजकीय विरोधकाच्या आरोग्यासाठी मोदींनी तातडीने सदिच्छा दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 

राहुल गांधी यांनी देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील सभा रद्द केल्या होत्या. इतर राजकीय पक्षांनी जास्त गर्दी होईल, असा प्रचार करणे टाळावे, असे आवाहनही केले होते. ते म्हणाले होते की, देशातील सध्याचे कोरोना संकट पाहता पश्चिम बंगालमधील सर्व सभा मी रद्द करीत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या परिस्थितीत जास्त गर्दी होईल अशा सभा घेणे धोक्याचे आहे. 

डॉ. मनमोहनसिंग 'एम्स'मध्ये दाखल 
दरम्यान, कालच (ता.19) माजी पंतप्रधान व काँग्रेस नेते डॉ. मनमोहनसिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. . त्यांना ताप आल्याने दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) 88 वर्षांच्या मनमोहनसिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस आधीच घेतले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com