Rahul Gandhi news: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: घाबरलेत... ;काँग्रेस नेत्याचा थेट पंतप्रधानांवर हल्लाबोल

Congress News | राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने देशभरात काँग्रेस आक्रमक झाली आहे.
Rahul Gandhi | Narendra Modi
Rahul Gandhi | Narendra ModiSarkarnama

Congress Leader Criticized Narendra Modi : "पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: घाबरले आहेत म्हणून ते राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांना वारंवार धमक्या देत आहेत.अदानी घोटाळा'वर संसदेत केलेल्या भाषणामुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे राहुल गांधींचे प्रयत्न आणि दुसरीकडे पंतप्रधानांचे कारस्थान ही षड्यंत्र विरुद्ध प्रयत्नांची लढाई आहे.असेही जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. 'मोदी'आडनावावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे काँग्रेसचे नेते, राहुल गांधी यांना आपली खासदारकी गमवावी लागली आहे. या कारवाईनंतर देशभरातून काँग्रेस आक्रमक झाली आहे. जयराम रमेश यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भारत जोडो यात्रेने भाजपला हादरुन सोडले आहे.या यात्रेने संपूर्ण देशात उत्साह निर्माण केला असून नव्या भविष्याचा मार्ग दाखवला आहे. कायदेशीर तरतुदीनुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Rahul Gandhi | Narendra Modi
Rahul Gandhi News : राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याची अशी आहेत नेमकी कारणं

राहुल गांधींवर ही कारवाई करुन देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर दिशा वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होत आहे. लोकशाहीचा गळा घोटला जात आहे.हा मुद्दा कायदेशीरपेक्षा राजकीय आहे. पण राहुल गांधी आणि काँग्रेसचा आवाज दाबणे इतके सोपे नाही. अशा शब्दांत काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधींवर झालेल्या कारवाईवर टिका केली आहे.

अभिषेक मनू सिंघवी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.राहुल गांधी बेधडक विधाने करतात.देशात लोकशाहीची हत्या होत आहे. लोकशाहीचा गळा घोटला जात आहे.हा मुद्दा कायदेशीरपेक्षा राजकीय आहे. या खटल्याचा निर्णय एवढ्या घाईघाईत का घेण्यात आला. या निर्णयामुळे नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे. तसेच संविधानात नोंद असलेले नियमांचा या प्रकरणात विचारकरण्यात आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सिंघवी म्हणाले की, राहुल गांधी संसदेत आणि संसदेबाहेर किती बेधडक बोलतात हे सर्वांना माहीत आहे.याची किंमत त्यांना मोजावी लागत आहे.लोकांचा आवाज दाबण्यासाठी सरकार नवनवीन मार्ग शोधत आहे. तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राहुल गांधींवर झालेल्या कारवाईवर हल्लाबोल केला आहे. “राहुल गांधींना अपात्र ठरवण्यासाठी हे सर्व प्रयत्न करण्यात आला आहे. लोकशाहीच्या तत्त्वांनुसार लोकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्यांना खरे बोलण्यासाठी आणि गप्प बसवण्यासाठी राहुल गांधींचे संसदेतील सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा आरोप खर्गे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com