Pushkar Singh Dhami News, PM Narendra Modi News in Marathi, pushkar singh dhami win
Pushkar Singh Dhami News, PM Narendra Modi News in Marathi, pushkar singh dhami winSarkarnama

आधी हरलेल्या मुख्यमंत्र्यांनी विक्रमी विजय मिळवताच पंतप्रधान मोदी म्हणाले...

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा मोठा विजय

डेहराडून : उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात भाजपने (BJP) सत्ता मिळवली होती पण मुख्यमंत्री (Chief Minister) पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांचा पराभव झाला होता. पराभूत होऊनही भाजपने त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली होती. त्यामुळे त्यांच्यासमोर पुन्हा निवडून येण्याचे आव्हान होते. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चंपावत मतदारसंघातून ते आता निवडून आले आहेत. यामुळे धामी यांची खुर्ची अखेर वाचली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Pushkar Singh Dhami wins form Champawat)

(PM Narendra Modi News in Marathi)

धामींनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 55 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. यानंतर धामी यांच्या विजयाचे मोदींनी कौतुक केलं आहे. मोदींनी ट्विटरवर धामींचं अभिनंदनही केलं आहे. ते म्हणाले की, उत्तराखंडचे कार्यक्षम मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचं चंपावतमधील विक्रमी विजयाबद्दल अभिनंदन. उत्तराखंडच्या प्रगतीसाठी ते आणखी कठोर परिश्रम करतील, असा मला विश्वास आहे. भाजपवर विश्वास ठेवल्याबद्दल मी चंपावतमधील जनतेचे आभार मानतो. याचबरोबर कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचेही मी कौतुक करतो.

Pushkar Singh Dhami News, PM Narendra Modi News in Marathi, pushkar singh dhami win
राज्यसभा निवडणूक होणारच! दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं टाकला पहिला डाव

धामी यांच्यासाठी भाजपकडून काही दिवसांपासून मतदारसंघाची निवड सुरू होती. अनेक आमदारांनी मुख्यमंत्र्यांसाठी मतदारसंघ सोडण्याची तयारी दाखवली होती. यात चंपावतचे आमदार कैलाश गहतोडी यांचाही समावेश होता. अखेर पक्षनेतृत्वाने चंपावतवर शिक्कामोर्तब केले होते. चंपावत हा भाजपचा बालेकिल्ला आहे. यामुळे धामी यांच्या विजयाची भाजपला खात्री होती. धामी यांनी आता येथून 55 हजारांच्या मताधिक्यानं दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांना प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला.

Pushkar Singh Dhami News, PM Narendra Modi News in Marathi, pushkar singh dhami win
अमित शहा अडचणीत? भाजपच्या बड्या नेत्यानंच केली राजीनाम्याची मागणी

उत्तराखंडमध्ये भाजपने 70 पैकी 47 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले. परंतु, त्यांचा खातिमा मतदारसंघात पराभव झाला होता. असे असले तरी ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आल्यानंतर त्यांना सहा महिन्यांत विधानसभेवर निवडून जाण्याचे आव्हान होते. अखेर हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करून धामी यांनी त्यांची खुर्ची बळकट केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com