पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? पंतप्रधान मोदींनीच आता सुचवला उपाय

पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरांचा देशभरात भडका
Narendra Modi and Petrol Pump
Narendra Modi and Petrol PumpSarkarnama

मुंबई : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू आहे. इंधन दरवाढीवरून ओरड सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आता थेट विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांकडं बोट दाखवलं आहे. या राज्यांनी पेट्रोलवरील करात कपात करावी, असं आवाहन मोदींनी केलं आहे. यामुळं या राज्यांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्यास इंधन स्वस्त होऊ शकतं. (Petrol Diesel price hike News)

मोदींनी आज देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यांनी वाढत्या पेट्रोल दरांचा मुद्दा उपस्थित केला. मोदींनी काही राज्यांतील पेट्रोल दरांचे उदाहरण दिले. यात महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांतील पेट्रोल दरांची तुलना त्यांनी भाजपशासित राज्यांतील दरांशी केली. ते म्हणाले की, जागतिक पातळीवर युद्धसदृश स्थिती आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे सर्वांनीच संघराज्य रचना लक्षात घेऊन सहकार्य करायला हवे. राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात करावी.

या वेळी बोलताना मोदी म्हणाले की, मी तुम्हाला एक छोटे उदाहरण देतो. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. त्यावेळी आम्ही राज्यांनाही व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले होते. काही राज्यांनी याला प्रतिसाद देत जनतेला दिलासा दिला. काही राज्यांनी मात्र, असं केलं नाही. यामुळं या राज्यांत पेट्रोल, डिझेलचे दर जास्त आहेत. तुम्ही यातून केवळ अन्याय करीत आहात आणि यामुळं शेजारी राज्यांवरही परिणाम होत आहे. मी कुणावर टीका करीत नसून, केवळ चर्चा करीत आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगण, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ आणि झारखंड या राज्यांनी काही कारणांमुळं व्हॅटमध्ये कपात केली नाही. याचा फटका नागरिकांना बसत असून, त्यांना इंधनासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. करात कपात केल्यास त्याचा महसुली फटका राज्यांना बसेल पण अनेक राज्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले आहे.

Narendra Modi and Petrol Pump
मी तुरुंगात 19 दिवस फक्त पाण्यावर काढले! सदावर्तेंचा खळबळजनक दावा

देशात महागाईचा भडका उडाल्याने मागील वर्षी मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) असल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. या निवडणुका संपल्या असून, या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका उडण्याचा अंदाज आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरू झाली आहे.

Narendra Modi and Petrol Pump
तुरुंगातून 19 दिवसांनी सुटका झाली अन् सदावर्तेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारला डिवचलं

सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 10 रुपयांनी महागले होते. त्यानंतर 6 एप्रिलनंतर ही दरवाढ थांबली आहे. मागील 21 दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.41 रुपये असून, डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com