Narendra Modi : गुजरात निवडणुकीच्या मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींनी आईची भेट घेऊन घेतले आशीर्वाद

Narendra Modi : मोदींनी आईशी गप्पा मारत चहा घेत आशीर्वाद घेतले...
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama

Narendra Modi News : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Election) दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधीनगरमध्ये जावून आपल्या आईची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी आईशी गप्पा मारत चहा घेतला. उद्या नरेंद्र मोदी हे रानीप येथे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मोदींनी आईची भेट घेतल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गुजरात (Gujarat) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. या निवडणुकीच्या आधी मोदींनी जोमाने प्रचार देखील केला. काल गुजरातमधील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार संपला. त्यानंतर त्यांनी आज गांधीनगरमध्ये (Gandhinagar) जावून आई हीराबेन मोदी यांची भेट घेतली. तसेच आईसोबत चहाचा आस्वाद घेत आशीर्वाद घेतले.

Narendra Modi
Rinky Pinky Atul marriage : जुळ्या बहिणींशी लग्न करणं पडलं महागात; संसार थाटण्याआधीच...

मोदींनी सलग दोन दिवस गांधीनगरमध्ये रोड शो केले. त्याआधी त्या ठिकाणी अनेक वेळा त्यांनी प्रचार सभा देखील घेतल्या. मात्र उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये गुजरातच्या मध्य आणि उत्तर भागातील नागरिक मतदान करणार आहेत. यामध्ये मध्य गुजरात आणि उत्तर गुजरातच्या १४ जिल्ह्यातील ९३ जागांसाठी हे मतदान पार पडणार आहे.

Narendra Modi
Amol Kolhe : आत्मक्लेश आंदोलनावरून खासदार कोल्हे अन् रोहित पवारांमध्ये ट्विटरवॅार!

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या आणि दुसऱ्या टप्यातील मतदानाचा निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे. यामध्ये भाजप (BJP), कॉंग्रेस, आप या पक्षासह बाकीचे काही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता गुजरातमध्ये पुन्हा कोणत्या पक्षाचं सरकार येणार हे मात्र निकालानंतरच समजणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com