Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेसचा ऐतिहासिक विजय; मोदींनी केलं काँग्रेसचं अभिनंदन, म्हणाले...

Prime Minister Narendra Modi : "लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा"
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 224 जागांपैकी जवळपास 135 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळताना दिसत आहे. तर भाजपला फक्त 63 जागा मिळताना दिसत आहे. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

कर्नाटकात भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. मात्र, तरी देखील भाजपला यश मिळवता आलं नाही. आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे.

काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट?

"कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा", असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

"कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो. आगामी काळात आम्ही कर्नाटकची सेवा आणखी जोमाने करू", असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांचेही कौतुक केलं.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com