महागाईत होरपळ सुरुच! एका आठवड्यात LPG सिलेंडरच्या दरवाढीचा दुसऱ्यांदा दणका

LPG Gas Cylinder | घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ, वाचा नवे दर
LPG Cylinder News
LPG Cylinder NewsSarkarnama

LPG Gas Cylinder Price | news

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतीने सर्वसामान्य नागरिक होरपळत असतानाच मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder rate increased) दरवाढीने सलग दुसऱ्यांदा दणका दिला आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या ( दरात आजपासून तब्बल ५० रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे घरगुती एलपीजी गॅसच्या १४.२ किलोच्या एका सिलेंडरसाठी सर्वसामान्यांना आता ९९९.५० रुपये मोजावे लागणार आहेत. (LPG Gas Cylinder Price)

यापूर्वी १ मे रोजी व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinder price hiked) दरात तब्बल १०२.५० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे हा सिलेंडर आता २ हजार ३५५.५० रुपयांना मिळत आहे. एकाच आठवड्यात झालेल्या या दरवाढीमुळे हॉटेलसह घरचे जेवण देखील महागले असून, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. (LPG Gas Cylinder rate increserd news)

दरम्यान यापूर्वी मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली होती. या सर्व वाढीच्या दरम्यान इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन देशभरात नुकताच उज्जवला दिवस साजरा करण्यात आला. यात ५ हजार एलपीजी पंचायतचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सुरक्षित आणि सातत्याने वापरासाठी माहिती दिली गेली. (LPG Cylinder latest news)

पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर :

गॅस सिलेंडर एका आठवड्यात दोनवेळा दणका दिला असतानाच पेट्रोल-डिझेलच्या किंमती मात्र मागील महिनाभरापासून स्थिर आहेत. इंधनाच्या दरात शेवटची वाढ ६ एप्रिल रोजी झाली होती. त्यापूर्वी साडेचार महिने स्थिर असलेल्या पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) दरवाढीला २२ मार्चपासून सुरुवात झाली होती आणि सहा एप्रिलपर्यंत दरात लिटरमागे दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढ झाली होती.

मात्र त्यानंतर आतापर्यंत पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागल्याचे पहायला मिळत आहे. आज जाहीर झालेल्या पेट्रोल, डिझेलच्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०५.४१ रुपये तर डिझेल ९६.६७ रुपये लिटर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर १२०.५१ तर डिझेल १०४.७७ रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव अनुक्रमे ११०.८५ व १००.९४ रुपये आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com