छत्रपतींपासून प्रेरणा घेत महात्मा गांधीनी हिंद स्वराज्य उभारलं : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath kovind) यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहित्याची प्रतिकृती भेट म्हणून दिले.
Ramnath kovind on raigad
Ramnath kovind on raigadSarkarnama

महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरित होत महात्मा गांधीजींनी हिंद स्वराज्य स्थापन केले होते. रायगडला भेट देणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. ही भेट आपल्यासाठी तीर्थयात्रा आहे असे म्हणत राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. राष्ट्रपती कोविंद यांनी आज किल्ले रायगडाला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवाजीराजेंच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सपत्निक आज दुपारी १२:३० च्या सुमारास पाचाड परिसरात आगमन झाले. इथून विशेष वाहनाने ते रायगड रोप-वे कडे गेले. त्यानंतर 'रोप-वे' मार्गे रायगड किल्ल्यावर गेले. रायगड 'रोप-वे' या ठिकाणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी राष्ट्रापतींचे स्वागत केले. किल्ल्यावर राष्ट्रपतींनी राजसदर, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट दिली.

Ramnath kovind on raigad
राष्ट्रपतींच्या रायगड दौऱ्यासाठी 700 पोलिसांचा बंदोबस्त

मागच्या आठवडाभरापासून राष्ट्रपती कोविंद यांच्या स्वागतासाठी किल्ले रायगडावर जय्यत तयारी सुरू होती. दिल्लीपासूनची पोलिस संरक्षण यंत्रणा गडावर कार्यरत होती. रायगडावर होळीच्या माळावर हेलिकॉप्टर उतरण्यास शिवभक्तांनी विरोध केल्यानंतर राष्ट्रपतींनी 'रोप-वे'मार्गे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज मुंबई विमानतळावर विमानाने आगमन झाल्यानंतर राष्ट्रपती हेलिकॉप्टरने पाचाडमध्ये उतरले. त्यानंतर विशेष वाहनाने ते रायगड रोप-वे कडे गेले आणि 'रोप-वे' मार्गे रायगड किल्ल्यावर गेले.

Ramnath kovind on raigad
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांनी घेतले बाळूमामांचे दर्शन

नियोजित दौऱ्यानुसार राष्ट्रपती दुपारी १:३० मिनिटांपर्यंत रायगडावर थांबणार होते; मात्र त्यांच्या भोजनाची व्यवस्था गडावरच असल्याने ४ वाजेपर्यंत ते गडावर होते. रायगडावर कोविंद यांच्यासाठी विशेष बग्गीची व्यवस्था निमंत्रकांनी केली होती. होळीचा माळ ते जगदीश्वर मंदिर या अंतरात या बग्गीचा वापर करण्यात आला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगड किल्ला परिसरातील एका पुस्तक प्रदर्शनालादेखील भेट दिली. यावेळी त्यांनी दोन पुस्तकांचे प्रकाशन केले. रायगडावर आधारित माहितीपटाचेदेखील त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच यावेळी राष्ट्रपतींना छत्रपती शिवरायांच्या पट्टा या शस्त्राची, मराठा धोप व सुवर्ण होणाची प्रतिकृती तसेच आज्ञापत्रातील एक उतारा आदरपूर्वक भेट म्हणून देण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com