राष्ट्रपती निवडणुकीतही वादाची ठिणगी; नितीन राऊतांना भाजपचे लोणीकर आणणार अडचणीत

विधानभनवात राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात...
MLA Nitin Raut Latest News, Babanrao Lonikar News
MLA Nitin Raut Latest News, Babanrao Lonikar NewsSarkarnama

मुंबई : राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. काही आमदारांच्या मतदानावर घेण्यात आलेला आक्षेप, क्रॉस वोटिंग, व्हीपची अंमलबजावणी असे नाट्य या निवडणुकीत पाहायला मिळाले. आता राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीतही वादाची ठिणगी पडली आहे. तीही मतदानाचा पहिला क्रमांक कुणाचा यावरून. (President Election News)

भाजपचे आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) आणि काँग्रेसचे आमदार नितीन राऊत (Nitin Raut) यावेळी आमनेसामने आहेत. मतदान सुरू होण्यासाठी राऊत हे मतदान कक्षात बसून होते. आम्ही तासभर रांगेत थांबलो होतो. पण त्यांनी आधी मतदान केल्याचा दावा लोणीकरांनी केला आहे. आता त्याविरोधात त्यांनी निवडणूक आयोगात तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.

MLA Nitin Raut Latest News, Babanrao Lonikar News
Eknath Shinde : शिंदेंकडून आदित्य ठाकरेंना झटका; ठाण्यात युवासेनेला पाडले खिंडार

माध्यमांशी बोलताना लोणीकर म्हणाले, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी माझा पहिला नंबर होता. आम्ही एक तास रांगेत उभे राहिलो. मात्र राज्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत अर्धा तास आधीच आतमध्ये जाऊन बसले होते. पण आम्ही रांगेत असताना त्यांनी आधी मतदान केले. हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे.

मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. नितीन राऊत यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांना मध्ये जाऊन बसता येत नाही. त्यामुळे त्यांचे मतदान रद्द करण्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे लोणीकर यांनी माध्यमांना सांगितले.

MLA Nitin Raut Latest News, Babanrao Lonikar News
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्या; पंतप्रधान मोदींनी साधला माध्यमांशी संवाद

दरम्यान, पहिलं मतदान केल्यानंतर राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पहिलं मतदान करण्याची संधी मला मिळाली. पक्षाच्या आदेशानुसार युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना आम्ही मतदान केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरघोस मतदान त्यांना मिळेल, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com