असा' होणार योगी आदित्यनाथांचा भव्यदिव्य शपथविधी सोहळा

Yogi Adityanath| Uttar pradesh| 50 संत-महंतांसह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी.नड्डा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
Yogi Adityanath
Yogi Adityanath

लखनौ : उत्तर प्रदेशात मिळालेल्या अभुतपुर्व यशानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांच्या शपथविधी सोहळ्याची युपीत जोरदार तयारी सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narednra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा असे बडे नेतेही या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भगव्या पक्षाचे नेतृत्व करून उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवून इतिहास रचणारे योगी आदित्यनाथ 25 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे प्रमुख नेते आणि केंद्रीय मंत्र्यांव्यतिरिक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) अध्यक्ष मोहन भागवत, इतर अनेक केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

Yogi Adityanath
अजितदादांची धान उत्पादकांसाठी मोठी घोषणा; शेतकऱ्यांना ६०० कोटी तत्काळ देणार!

योगी आदित्यनाथ यांचे प्रतिस्पर्धी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही या सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले आहे. "काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा, समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना विरोधी पक्षांकडून आमंत्रित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लखनौच्या एकना स्टेडियमवर या योगी आदित्यनाथांच्या शपथविधी सोहळ्याची भव्य तयारी सुरू झाली आहे. भाजपकडून मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे निश्चित केली जात आहेत. उत्तर प्रदेशातील सरकार स्थापनेवर देखरेख ठेवण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास देखील अमित शहा यांचे सह-निरीक्षक म्हणून त्यांना मदत करणार आहे. भाजपने 403 पैकी 255 जागा जिंकून आणि 41.29 टक्के मते मिळवून उत्तर प्रदेशात सत्ता कायम ठेवली. गेल्या ३७ वर्षांत युपीत आपला कार्यकाळ पूर्ण करून सत्तेत परतणारे आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री असतील.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अयोध्या, वाराणसी आणि मथुरा येथील प्रमुख संतांना निमंत्रित करण्यात आले आहे. शुक्रवारी अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येतील सर्व प्रमुख 50 संतांची यादी तयार करण्यात आली आहे.

Yogi Adityanath
'पणन'चा पदभार घेताच जयंत पाटलांकडून कापूस उत्पादकांसाठी मोठी घोषणा 

योगी आदित्यनाथांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मथुरा आणि काशीच्या संतांची यादीही तयार करण्यात आली आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्यासह ट्रस्टच्या प्रमुख सदस्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी, ज्यांना 'भाषाभारती' म्हणून ओळखले जाते, ते देखील या कार्यक्रमाला आमंत्रित केलेल्यांमध्ये आहेत. दरम्यान, सुमारे 50,000 लोकांची आसनक्षमता असलेल्या स्टेडियममध्ये कार्यक्रमासाठी व्यवस्था केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com