अखेर ठरलं! माजी मुख्यमंत्री राणे विरुद्ध सूनबाई अशीच लढत

गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे.
BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. यातच काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) हे पर्येमधून मैदानात उतरले आहेत. राणेंचा सामना आता भाजपमधील (BJP) त्यांच्याच सूनबाईंशी होणार आहे. काही दिवसांपूर्वी मुलाच्या विरोधात लढण्याची घोषणा करणारे राणे आता सुनेच्या विरोधात लढणार आहेत.

प्रतापसिंह राणे यांनी मुलाच्या विरोधात लढण्याची घोषणा केली होती. यानंतर काँग्रेसने तातडीने पावले उचलत राणे यांना पर्ये मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. भाजपने त्यांचे पुत्र व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना वाळपोई तर सूनबाई दिव्या यांना पर्येतून उमेदवारी दिली. यामुळे आता प्रतापसिंह राणे हे मुलाऐवजी सुनेच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत. त्यांनी आज पर्ये येथील भूमिका देवी मंदिरात गाऱ्हाणे घालून काँग्रेसच्या प्रचाराची सुरवात केली आहे. या वेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळे राणे माघार घेणार असल्याच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला आहे.

प्रतापसिंह राणे हे 82 वर्षांचे असून, ते 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते गोव्याचे सहा वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी पुत्राच्या विरोधातच निवडणूक लढण्याची घोषणा करुन राज्यात राजकीय भूकंप घडवला होता. विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातले राजकीय वातावरण तापले असताना राणे-पिता पुत्रांच्या लढतीने त्यात भर पडली होती. आता राणे हे मुलाऐवजी सूनबाई डॉ.दिव्या राणे यांच्या विरोधात लढणार आहेत. पर्ये हा विश्वजित राणेंचा बालेकिल्ला असून, कायम त्यांचा तेथे विजय होत आला आहे.

BJP and Congress
फडणवीसांनी मोठी ऑफर देऊनही मी पक्ष सोडला! बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

राणेंना भाजपकडून आजन्म कॅबिनेट दर्जा

प्रतापसिंह राणेंना राज्यातील भाजप सरकारने नुकताच आजन्म कॅबिनेट दर्जा दिला आहे. त्यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हणाले होते की, आमच्या सरकारने ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांना आजन्म मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष अशी महत्वाची पदे भूषवली आहेत. गोव्यातील सर्व स्तरातील जनतेला ते कायम प्रेरणादायी ठरले आहेत. राज्य आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करीत असताना कायम त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला आवश्यकता आहे. भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.

BJP and Congress
एलपीजी सिलिंडर 500 रुपयांच्या आतच मिळणार! मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनेही जोर लावला असला तरी प्रत्यक्षात मागील निवडणुकीएवढी ताकद आता राहिलेली दिसत नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला 40 पैकी 17 जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक आमदार काँग्रेसचे होते पण त्रिशंकू स्थितीमध्ये काँग्रेसला चकवा देत भाजपने सत्ता स्थापन केली होती. हीच काँग्रेसची धूळधाण उडण्याची सुरूवात होती. निवडणुकीच्या तोंडावर राज्यात काँग्रेसचे केवळ 2 आमदार उरले असताना काँग्रेसनेही भाजपच्या अनेक नेत्यांना फोडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com