प्रशांत किशोर करणार धमाका; 'सुरूवात बिहारपासून' असं म्हणत दिले मोठे संकेत

आधी भाजप, नंतर काँग्रेस, जेडीयू, तृणमूल अशा विविध राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीती आखणारे प्रशांत किशोर मोठं पाऊल उचलण्याच्या तयारी असल्याचे संकेत आहेत.
Prashant Kishor
Prashant KishorSarkarnama

नवी दिल्ली : आधी भाजप (BJP), नंतर काँग्रेस, जेडीयू, तृणमूल अशा विविध राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीती आखणारे प्रशांत किशोर (Prashant Kishor) मोठं पाऊल उचलण्याच्या तयारी असल्याचे संकेत आहेत. त्यांनीच याबाबत सूचक ट्विट केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. प्रशांत किशोर हे स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची शक्यता असून त्याची सुरूवात बिहारपासून (Bihar) होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

प्रशांत किशोर हे राजकीय रणणीतीकार म्हणत प्रसिध्द आहेत. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण काँग्रेसचा प्रस्ताव त्यांनीच फेटाळून लावला. त्याआधी ते जेडीयूमध्येही सहभागी झाले होते. पण आता ते स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांनी सोमवारी सकाळी सूचक ट्विट केले आहे. एकाचवेळी देशभरात त्यांचा पक्षाचे काम सुरू होईल, अशीही चर्चा आहे. अद्याप त्यांच्या पक्षाचे नाव ठरले नसले तरी पुढील एक-दोन वर्षांत त्यांचा पक्ष प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.

Prashant Kishor
राज ठाकरेंच्या सभेनंतर पोलीस अॅक्शन मोडवर; प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची होणार धरपकड?

काय म्हटलं आहे ट्विटमध्ये?

लोकशाहीमध्ये प्रभावशाली योगदान देण्याची आपली भूक आणि लोकांसाठी कामाचे धोरण तयार करण्याचा दहा वर्षांच्या प्रवासात खूपच उतार-चढाव आले. आज ही पाने उलटताना वाटते की, आता वेळ आली आहे. खऱ्या नायकांमध्ये म्हणजे लोकांमध्ये जाण्याची. जेणेकरून त्यांच्या समस्या अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता येतील आणि 'जन सुराज'च्या मार्गावर पुढे जाता येईल. याची सुरूवात बिहारपासून, असं ट्विट प्रशांत किशोर यांनी केलं आहे.

काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची (Congress) ऑफर नाकारली असून काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर त्यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. पक्षाला माझ्यापेक्षा एका चांगल्या नेतृत्वाची आणि तळागाळातील अडचणी सोडवण्याची गरज असल्याच्या कानपिचक्याही त्यांनी यावेळी दिल्या. प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मागील काही दिवसांमध्ये ५ ते ६ वेळा भेट घेतली होती. त्यावरुन त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित मानला गेला होता.

काय म्हणाले प्रशांत किशोर?

मी EAG चा भाग म्हणून काँग्रेस पक्षात सामील होण्यासाठी आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची ऑफर नम्रपणे नाकारली आहे. तसेच परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाला माझ्यापेक्षा अधिक एका सक्षम नेतृत्वाची आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

मागील सात ते आठ वर्षांपासून भाजप अधिकाधिक सशक्त होत आहे. तर काँग्रेसची ताकद सातत्याने कमी होत आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाला या स्थितीमधून बाहेर काढण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi ) यांनी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्यासाठी इच्छूक असल्याची माहिती होती. त्यांच्यासोबत झालेल्या भेटींमध्ये किशोर यांनी काँग्रेससाठी रोड मॅप दिला असल्याचेही सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com