प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ऑफर नाकारली; नेतृत्वाचा प्रश्न सोडवण्याचा सल्ला

Prashant Kishor | Congress : प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्तित होता...
Prashant Kishor Latest News, Prashant Kishor, Congress party
Prashant Kishor Latest News, Prashant Kishor, Congress partySarkarnama

दिल्ली : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसची (Congress) ऑफर नाकारली असून काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर त्यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. पक्षाला माझ्यापेक्षा एका चांगल्या नेतृत्वाची आणि तळागाळातील अडचणी सोडवण्याची गरज असल्याच्या कानपिचक्याही त्यांनी यावेळी दिल्या. प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मागील काही दिवसांमध्ये ५ ते ६ वेळा भेट घेतली होती. त्यावरुन त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित मानला गेला होता. (Prashant Kishor declined the generous offer of congress to join the party)

काय म्हणाले प्रशांत किशोर?

मी EAG चा भाग म्हणून काँग्रेस पक्षात सामील होण्यासाठी आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची ऑफर नम्रपणे नाकारली आहे. तसेच परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाला माझ्यापेक्षा अधिक एका सक्षम नेतृत्वाची आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

मागील सात ते आठ वर्षांपासून भाजप अधिकाधिक सशक्त होत आहे. तर काँग्रेसची ताकद सातत्याने कमी होत आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाला या स्थितीमधून बाहेर काढण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi ) यांनी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्यासाठी इच्छूक असल्याची माहिती होती. त्यांच्यासोबत झालेल्या भेटींमध्ये किशोर यांनी काँग्रेससाठी रोड मॅप दिला असल्याचेही सांगितले होते.

मात्र किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशावरुन नेत्यांमध्ये एक वाक्यता नव्हती. किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला तर त्यांचा फायदा काँग्रेसला नक्की होणार आहे, अन्य लहान पक्ष आणि संघटना यांच्याशी त्यांचे असलेला संबध यामुळे काँग्रेसला मदत होईल,असे काही नेत्यांचे मत होते. तर दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे काही नेत्यांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबाबत काँग्रेसमध्ये एकवाक्यता नव्हती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com