जावडेकर, दिग्विजयसिंह, सुरजेवाला यांना कोरोनाची बाधा तर येडियुरप्पा दुसऱ्यांदा ‘पॉझिटिव्ह’

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक नेते कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.
prakash javdekar and b s yediyurappa test covid 19 positive
prakash javdekar and b s yediyurappa test covid 19 positive

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जावडेकर यांनीच ट्विटरवर याची माहिती दिली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला हेसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना आठ महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ते उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. ‘माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेत विलगीकरणात जावे, असे ट्विट येडियुरप्पांनी केले आहे. त्यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कोरोना संसर्ग झाला होता. येडियुरप्पांनी 12 मार्चला कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. याचबरोबर दोनच दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. 

कर्नाटकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या उच्चांकी पातळीवर पोचली आहे. यामुळे आज सकाळीच येडियुरप्पा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. राज्यात कडक निर्बंध लागू करण्याबाबत ही बैठक होती. या बैठकीला अनेक मंत्री उपस्थित होते. आता मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आल्याने बैठकीला उपस्थित मंत्र्यांसह राज्य सरकारची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, बेळगावमधील लोकसभा पोटनिवडणूक झाल्यानंतर कर्नाटकात कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. 

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ट्वीट करुन त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे जाहीर केले. मागील दोन ते तीन दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनाही संसर्ग झाला आहे.  दिग्विजयसिंह यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ते सध्या घरीच विलगीकरणात आहेत. सुरजेवाला यांनीही त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी पाच दिवस विलगीकरणात जावे आणि चाचणी करुन घ्यावे, असे आवाहन केले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com