इंधन दरवाढीच्या झळा; देशात सर्वांत महाग पेट्रोल महाराष्ट्रात तर स्वस्त पोर्ट ब्लेअरमध्ये!

पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरांचा देशभरात भडका उडाला आहे.
petrol and diesel prices
petrol and diesel pricesSarkarnama

मुंबई : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. असे असले तरी सलग 12 दिवस या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्याआधी 16 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू होती. आतापर्यंतची ही वाढ 10 रुपयांवर गेली आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू होती. देशात सर्वांत महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीत तर सर्वांत स्वस्त पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. (Petrol Diesel price hike News)

पेट्रोल, डिझेलच्या दरात सुमारे साडेचार महिन्यांनंतर 22 मार्चपासून वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली होती. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.41 रुपये झाला असून, डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये आहे. सर्वांत महागडे पेट्रोल परभणीत प्रतिलिटर 123.47 रुपये आहे. सर्वांत स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये प्रतिलिटर 91.45 रुपये आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 12 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल 10 रुपयांनी महागले आहे.

petrol and diesel prices
भाजपची डोकेदुखी वाढली! बड्या नेत्याच्या विरोेधात हिंदुत्ववादी संघटनाच उतरली मैदानात

रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल 100 डॉलरवर गेला आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. असे असतानाही उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे चार महिने स्थिर होते. या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात आता वाढ सुरू झाली आहे. याआधी सीएनजीचा दरात सातत्याने वाढ करण्यात आली असून, यानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचा नंबर लागला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

petrol and diesel prices
भाजपच्या घाटगेंना हसन मुश्रीफ समर्थकांचं जशासं तसं उत्तर!

देशात महागाईचा भडका उडाल्याने मागील वर्षी मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) असल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. या निवडणुका संपल्या असून, या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका उडण्याचा अंदाज आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com