राष्ट्रपती भवनातील पोर्ट्रेट नेताजींचे की त्यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे?

राष्ट्रपती भवनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पोर्ट्रेट लावण्यात आले आहे. या पोर्ट्रेटवरुन आता गदारोळ सुरू झाला आहे.
portrait of netaji bose in rashtrapati bhavan creates controversy
portrait of netaji bose in rashtrapati bhavan creates controversy

कोलकता : राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच नेताजी बोस यांच्या पोर्ट्रेटचे अनावरण केले. हे पोर्ट्रेट नेताजींचे नसून, त्यांच्यावरील चरित्रपटात भूमिका साकारणारे अभिनेते प्रसेनजित चटर्जी यांचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

नेताजींच्या जयंतीदिवशी पराक्रम दिवस साजरा करण्याची घोषणा केंद्र सरकारने नुकतीच केली होती. नेताजींच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोलकत्यात मोठा कार्यक्रमही केला होता. या कार्यक्रमात नेताजींवर हक्क सांगण्यासाठी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू असल्याचे दिसून आले. या कार्यक्रमात गदारोळही झाला होता. 

आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात नेताजींच्या पोर्ट्रेटचे अनावकरण केले आहे. या पोर्ट्रेटवरुन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाचे छायाचित्र ट्विट करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर या पोट्रेटवरुन गदारोळ सुरू झाला. हे पोर्ट्रेट नेताजींचे नसल्याचा दावा अनेक सोशल मीडिया यूजरनी केला आहे. नेताजींच्यावरील 'गुमनामी' या 2019 मधील चित्रपटात प्रसेजनजित चटर्जी यांनी नेताजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील नेताजींच्या वेषातील चटर्जींचे पोर्ट्रेट राष्ट्रपती भवनात लावल्याचा दावा करण्यात आला आहे. 

तृणमूल काँग्रेसने या मुद्यावर भाजपला लक्ष्य केले आहे. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे की, राम मंदिराला पाच लाख रुपयांची देणगी दिल्यानंतर आता राष्ट्रपतींनी अभिनेता प्रसेनजित यांचे पोर्ट्रेट राष्ट्रपती भवनात लावले आहे. 

दरम्यान, या सर्व वादावर भाजप नेत्यांनी उघडपणे बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, काही नेत्यांनी हे पोट्रेट पद्मश्री सन्मान मिळालेले चित्रकार परेश मैती यांनी साकारल्याचे सांगितले आहे. नेताजींच्या कुटुबीयांनीच हे पोर्ट्रेट सरकारला दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, कोणत्या नातेवाईकाने हे पोर्ट्रेट दिले हे मात्र, स्पष्ट करण्यात आलेले नाही. 

या पोर्ट्रेटवरुन सोशल मीडियावर अनेक मिम्स तयार करण्यात आले आहेत. काही यूजरनी तर महात्मा गांधी म्हणून बेन किंग्जले आणि नरेंद्र मोदी म्हणून विवेक ओबेरॉय यांचे पोर्ट्रेट राष्ट्रपती भवनात लावावे, अशी उपरोधिक मागणी केली आहे.  

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com